SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दाक्षिणात्य डायरेक्टर निघाला ट्रेनमधला वाँटेड चोर! प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप चोरायचा अन्...; पोलिसही हादरले

मनोरंजनसृष्टीमधील अपयशामुळे एखाद्या व्यक्तीवर किती वाईट वेळ येऊ शकते याचं उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे. नेमका हा दिग्दर्शक कोण? त्याला कशी आणि कुठे अटक झाली? त्याच्यासोबत नक्की झालं काय? जाणून घ्या सविस्तर...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 13, 2026, 10:52 AM IST | Updated: Oct 13, 2026, 11:20 AM IST
Image Credit: पोलिसांनी या आरोपीसंदर्भातील जुनी प्रकरणंही शोधून काढली (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य एआयवरुन साभार)
Join

मनोरंजनसृष्टीमधील यश जितकं चकाकणारं असतं तितकेच अपयश हे निराशाजनक असतं, असं म्हटलं जातं. याची अनेक उदाहरणं समोर आहेत. मात्र आकर्षक वाटणाऱ्या या क्षेत्राची दाहकत दाखवणारं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एकेकाळी दिग्दर्शक म्हणून मिरवणारी व्यक्ती अपयशामुळे एवढी खचून गेली की ती ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करु लगाली. होय एक चित्रपट दिग्दर्शकला मोबाईल, लॅपटॉप चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा दिग्दर्शक कोण, त्याच्यासोबत नक्की झालं काय जाणून घेऊयात...

पोलिसांनाही बसला धक्का

2024 मधील या दिग्दर्शकाचा चित्रपट तिकीटबारीवर व्यावसायिकदृष्ट्या आपटला. त्याला मोठं अपयश आलं. मात्र या आर्थिक विवंचनेत तो इतका अडकला की तो रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरु लागला. अशाच एक चोरीनंतर तपास करुन त्याला पकडण्यात आलं. त्याला पकडल्यानंतर जे काही समोर आलं ते पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. पोलिसांना या साऱ्याचा धक्का बसण्याचं मुख्य कारण म्हणजे यापूर्वीच्या अनेक चोरीच्या प्रकरणांशी या डायरेक्टरचाच संबंध असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ही शक्यता बोलून दाखवली आहे.

हा दिग्दर्शक कोण?

हा दिग्दर्शक दाक्षणित्य चित्रपटसृष्टीमधील आहे. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील करिंबा येथील रहिवासी असलेले 46 वर्षीय काजा हुसेन हे पूर्वी दिग्दर्शक होते. मात्र आता त्यांना चोरीच्या आरोपाखाल शोरनूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 'मंगळुरू सेंट्रल इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस'मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा 80 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोणत्या चित्रपटाची केलेली निर्मिती?

हुसेन यांनी 'कल्लन्नमारुडे वीडू' (Kallanmarude Veedu) या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरल्यामुळे हुसेन यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक

'भारतीय न्याय संहिते'च्या कलम 305 अन्वये हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर, वाहने किंवा प्रार्थनास्थळांसारख्या ठिकाणी होणाऱ्या चोरीशी संबंधित हे कलम आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला, असे मल्याळम प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

कथित चोरी कशा प्रकारे केली जायची?

हुसेन रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे लक्ष विचलित असताना मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरायचे. कामाच्या निमित्ताने ते वारंवार रेल्वेने प्रवास करायचे. चोरी करण्यापूर्वी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी ते या प्रवासाच्या आयत्या संधीचा वापर कायचे असं 'रिपोर्टर लाइव्ह' आणि 'सिराज लाइव्ह' या मल्याळम वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

चोरीच्या वस्तुंची विक्री कशी व्हायची?

हुसेन स्वतःची ओळख 'सेकंड-हँड' (वापरलेल्या) वस्तूंचा व्यापारी असल्याचं सांगत करुन द्यायचे. याच ओळखीच्या आधारे ते चोरलेली उपकरणं दुकानांमध्ये विकायचे. पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी आपला लूक बदलला होता. ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी काढून टाकली होती, असं 'सिराज लाइव्ह'च्या वृत्तात म्हटलंय.

पाच लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त

पोलिसांनी हुसेन यांच्याकडून पाच लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. या गोष्टी चोरीच्या असल्याची शंका पोलिसांना असल्याचं, 'रिपोर्टर लाइव्ह' आणि 'सिराज लाइव्ह'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. शोरनूर रेल्वे पोलिसांनी दाखल केलेल्या तीन प्रकरणांशी आणि कोझिकोड भागात नोंदवलेल्या चोरीच्या घटनांशी संबंधित ही जप्तीची कारवाई संबंधित असल्याचे या वाहिन्यांनी म्हटले आहे.

आधीच्या घटनांशीही संबंध

तपासादरम्यान, हुसेन यांचा संबंध कोझिकोड भागातील रेल्वेमध्ये लॅपटॉप चोरीच्या आधीच्या घटनांशीही जोडला गेला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांच्यावर तिथे दोन लॅपटॉप चोरल्याचा आरोप आहे. 'मनोरमा न्यूज'च्या वृत्तानुसार, या भागात चार लॅपटॉप चोरीच्या घटनांशी त्यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. हा एक वाँटेड चोर असल्याचं नंतर समोर आलं.

आर्थिक फसवणुकीचा आधीचा खटला

चित्रपट निर्मितीशी संबंधित आर्थिक फसवणुकीच्या आरोपही हुसेन यांच्यावर करण्यात आलेले. या प्रकरणातही त्यांच्याविरुद्ध खटला सुरु आहे. जुलै 2024 मध्ये 'मल्याळम मनोरमा'ने दिलेल्या वृत्तानुसार, पालक्काड जिल्ह्यातील एका मांस व्यापाऱ्याने हुसेन यांच्यावर आरोप केला होता की, एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचे आणि नफ्यातील वाटा देण्याच्या बदल्यात निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून 67.5 लाख रुपये हुसेन यांनी घेतले होते. हुसेन यांनी पैसे परत करण्यास वारंवार टाळाटाळ केल्यामुळे तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली होती. अटकेपूर्वी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता, असंही या वृत्तात म्हटलंय.  हा आधीचा खटला चित्रपट निर्मितीशी संबंधित कथित फसवणुकीचा होता आणि रेल्वेतील चोरीच्या ज्या प्रकरणांमध्ये हुसेन यांना आता अटक करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES