गणेश चतुर्थीच्या शुभदिनी जुबिन नौटियालच्या घरी चिमुरड्याचं आगमन, पत्नीने दिला मुलाला जन्म
जुबिन नौटियाल याच्या पत्नीने 14 सप्टेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला आहे, हा क्षण या जोडप्यासाठी आणखी खास आहे, कारण त्यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे.
प्रसिद्ध बॅालिवूड सिंगर जुबिन नौटियाल यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. जुबिन नौटियाल यांच्या घरी कुटुंब अत्यंत आनंदी झाले आहे आणि गायकाच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. जुबिन नौटियाल याच्या पत्नीने 14 सप्टेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला आहे, हा क्षण या जोडप्यासाठी आणखी खास आहे, कारण त्यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे. गायकाला त्यांना बाप्पाचे अनमोल आशीर्वाद लाभले आहेत, जोडप्याने अद्याप आपल्या बाळाचे नाव ठरवलेले नाही. आई आणि बाळ दोघेही निरोगी असून घरी परतले आहेत.
गायकाने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ही आनंदाची बातमी दिली. त्याने सांगितले की तो आता वडील झाला आहे. आई आणि बाळ दोघेही निरोगी असून घरी परतले आहेत. "आमच्या मुलाचा जन्म गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी, १४ सप्टेंबर रोजी झाला," असे जुबिनने सांगितले . मुलाच्या जन्मापासून जुबिनचे कुटुंब आनंदाने भरून गेले आहे. लहान राजकुमाराला पाहून सर्वजण खूप खुश आहेत. नौटियाल कुटुंब आनंद साजरा करत आहे. चाहत्यांनीही गायकाचे अभिनंदन केले आहे. हे कुटुंब त्यांच्या घरात आलेल्या नव्या सदस्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. झुबिनच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
तो म्हणतो, "आम्ही आमच्या मुलाचे नाव अजून ठरवलेले नाही. आम्ही सध्या त्याच्यासोबत सुंदर क्षणांचा आनंद घेत आहोत." चाहत्यांनी झुबिनला त्याच्या मुलाची एक झलक दाखवण्याची विनंती केली आहे. तथापि, सर्वांना माहित आहे की झुबिन त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जपून वागतो. त्याने त्याच्या लग्नाची बातमीसुद्धा गुप्त ठेवली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झुबिनने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले. या वर्षी एप्रिलच्या मध्यात, एका अज्ञात मुलीसोबतचा त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता, जो त्याच्या लग्नाचा फोटो असल्याचा दावा केला जात होता. गायकाच्या लग्न हे देखील एक मिस्ट्री होती त्याने यासंदर्भात कधीही उघडपणे सांगितले नाही.
जेव्हा गायक जुबिन नौटियालने लग्न केले, तेव्हा त्याने ही गोष्ट जगापासून गुप्त ठेवली होती. लोकांना बऱ्याच काळाने याबद्दल कळले. आणि जेव्हा गायकाने आपल्या लहानग्या पाहुण्याचे स्वागत केले, तेव्हाही त्याने ही गोष्ट गुप्तच ठेवली. जुबिनने १४ सप्टेंबर रोजी आपल्या मुलाचे स्वागत केले. पण त्याने ही गोष्ट गुप्त ठेवली होती. तथापि, त्याने अलीकडेच बॉम्बे टाइम्सशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला आहे.