ही तरुणी माधुरी दीक्षितची होणारी सून? दिवाळी पार्टीत मोठ्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत एन्ट्री
माधुरी दीक्षितची सून? ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण सध्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगलीये.
बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळी पार्टीचा माहौल आहे. लोकप्रिय फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने 5 नोव्हेंबर रोजी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. यावेळी अनेक मोठे सेलिब्रिटी पार्टीत पोहोचले होते. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितदेखील तिच्या कुटुंबासोबत पोहोचली होती. डॉ. श्रीराम नेने आणि मुलगा अरीन नेने हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी त्यांच्यासोबत एक मिस्ट्री गर्लदेखील सोबत होते. अरीन नेनेच्या बाजूला असलेली ही तरुणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जातंय.
मनीष मल्होत्राच्या पार्टीत माधुरीचा मोठा मुलगा अरीनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पार्टीत तो त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पोहोचला होता. दोघांचाही स्टायलिश अवतार लक्ष वेधून घेत होते. अरिनने सिल्व्हर डिपनेक शर्ट आणि ब्लॅक शिमर पँट परिधान केली होती. तर त्याच्यासोबत त्याच्या गर्लफ्रेंडने काळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातला होता. अरिनच्या बाजूलाच पोझ देत तिने फॅमिली फोटोसाठी पोज दिली होती.
पार्टीत पोहोचल्यानंतर माधुरी आणि श्रीराम नेने फोटोसाठी उभे असताना अरीन आणि त्याची गर्लफ्रेंड लांब उभे होते. तेव्हा माधुरीने दोघांनाही फोटोसाठी बोलवून घेतले. अरीनसोबत असलेल्या या तरुणीचे नाव खुशी असून त्यांच्या नात्याला 2 वर्ष झाल्याचं सांगण्यात येतेय. खुशीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोत तिने अरीनसोबतचे फोटो टाकले आहेत. तसंच, त्यावर तिने #2year #bless असं लिहिलं आहे. तर तिच्या पोस्टवर अरीनने माय हार्ट असं लिहिलं आहे.
अरीन हा माधुरी दीक्षित आणि डॉ.श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा आहे. तर रायन धाकटा मुलगा आहे. दोघांचंही शिक्षण अमेरिकेत झालं. अरिन सध्या अॅपलमध्ये नोकरीला असल्याचंच माधुरीने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते. दरम्यान, मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होताच माधुरीने तिच्या होणाऱ्या सुनेला सॉफ्ट लाँच केल्याचं बोलंल जातंय.
दरम्यान, खुशीने पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर स्टोरीवर अपलोड केले आहेत. एका फोटोत ती अरीनसोबत दिसतेय. तर एका स्टोरीत अभिनेत्री करिना कपूरसोबत तिने फोटो शेअर केला आहे. तर, तिच्या बाजूलाच माधुरी दीक्षित उभी असल्याचे दिसतेय. या आधीही अशाच एका इव्हेंटमध्ये खुशीने अरिनसोबत उपस्थिती दर्शवली होती. तेव्हाही दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तर, आता पुन्हा एकदा खुशी-अरीन यांना एकत्र पाहिल्यानंर नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी ही माधुरीची होणारी सून आहे का? असंही म्हटलं आहे.