नानांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची शेवटची संधी... 'हा' ठरणार अखेरचा चित्रपट; रिलीज डेटही जाहीर; पहिली झलक पाहिली का?
नाना पाटेकरांचं 8 ऑक्टोबर रोजी गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नाना पाटेकरांच्या निधानंतरही त्यांनी भूमिका साकारलेले काही चित्रपट आता मरणोत्तर प्रदर्शित होणार आहेत. नानांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्याची ही संधी कधी मिळणार जाणून घ्या...
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना यांच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यात वास्तव्यास असतानाच नानांवर काळाने घाला घातला. नाना हे वयाच्या 75 व्या वर्षीही मनोरंजनसृष्टीत सक्रीय होते. नानांच्या मृत्यूनंतर त्यांचे काही चित्रपटांचे प्रदर्शन आता मरणोत्तर होईल. यापैकी काही चित्रपट या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. नानांचे कोणते चित्रपट त्यांच्या मरणानंतर प्रदर्शित होणार आहेत आणि त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता ठरु शकतो जाणून घेऊयात...
ईठा
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ईठाचित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक नाटक आहे. श्रद्धा कपूरने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धाबरोबरच रणदीप हुड्डा, अनंत जोशी यांच्यासह नाना पाटेकरही दिसणार आहेत. हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
शक्ती शालिनी (Shakti Shalini)
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील शक्ती शालिनी हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. अनीत पड्डा, विशाल जेठवा, विनीत कुमार सिंह यांच्यासोबत नाना पाटेकर यांनी या चित्रपटामध्ये मांत्रिक बाबाची भूमिका केली आहे. या चित्रपटाची शूटिंग मे 2026 मध्ये पूर्ण झाली होती. सुरुवातीला 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता तो जानेवारी 2027 किंवा त्याही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. दिग्दर्शकाने हा नानांचा शेवटचा चित्रपट ठरु शकतो, असे म्हटले आहे.
द कन्फेशन ऑफ मेरी
अनंत महादेवन दिग्दर्शित गुन्हेगारी कथानकावर आधारित या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी फादर बेनेडिक्टची भूमिका केली आहे. या चित्रपटामधील काही संवाद बदल बाकी असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची डिसेंबरमधील तारीख अजून निश्चित झालेली नाही.
हयात असताना प्रदर्शित झालेला चित्रपट कोणता?
नाना पाटेकर यांनी 1978 ते 2026 दरम्यान सुमारे 70 हून अधिक चित्रपटांत काम केले. मरणोत्तर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा विचार केल्यास ही संख्या वाढू शकते. नानांची कारकीर्द मुख्यतः हिंदी आणि मराठी चित्रपटांत होती तरी त्यांनी काही तमिळ, कन्नड आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं. नानांचा पहिला चित्रपट गमन (1978) होता. परिंदा (1989), प्रहार (1991), क्रांतिवीर (1994), नटसम्राट (2016) हे प्रमुख नानांच्या कारकिर्दीमधील प्रमुख चित्रपट आहेत. ते हयात असताना प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर ओ रोमियो आणि सुबेदार या चित्रपटांची नावं घेता येतील.