'शोले'च्या सेटवर फोटोचा किस्सा आणि लीड रोल... सचिन पिळगावकर भरभरून बोलले!
शोले सिनेमाच्या वेळी झाल्याल्या किस्सा देखील त्यांनी उघडपणे सांगितला आहे. शोले सिनेमाच्या नंतर अभिनेते सचिन पिळगावकर यांना ब्रेक मोठा मिळाला होता याबद्दल त्यांनी उघडपणे सांगितले आहे.
अभिनेते सचिन पिळगावकर यांची एक खास मुलाखत झी 24 तासच्या टू द पॅाइंट या शोमध्ये पार पडली. या शोमध्ये सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या जुन्या आठवणी या मुलाखतीमध्ये शेअर केल्या आहेत. सचिन पिळगावकर यांनी अनेक हिंदी सिनेमामध्ये देखील काम केले आहे, त्यामधील प्रसिद्ध सिनेमा शोलेमध्ये देखील त्यांनी काम केले होते. त्यांनी आता शोले सिनेमाच्या वेळी झाल्याल्या किस्सा देखील त्यांनी उघडपणे सांगितला आहे. शोले सिनेमाच्या नंतर अभिनेते सचिन पिळगावकर यांना ब्रेक मोठा मिळाला होता याबद्दल त्यांनी उघडपणे सांगितले आहे.
शोले या सिनेमाच्या वादाबद्दल देखील सचिन पिळगावकर यांनी सांगितले आहे. शोले सिनेमामधील एॅक्शन करण्यासाठी दुसरे युनिट बोलवण्यात आले होते. असे काही भाग होते जे स्वत: दिगदर्शित करणार नव्हते. दिग्दर्शनासाठी एक वेगळी टीम तयार करण्यात आली होती. या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी हॅालिवूडमधील देखील काही माणसे आली होती, या सर्व लोकांचे काम होते की त्याचे चित्रीकरण करणे. रमेशजी यांना रेप्रेजेन्ट करायला त्यांनी सचिन पिळगावकर आणि अमजद खाना यांना निवडण्यात आले होते. त्यावेळी आम्ही एकही शॅाट डायरेक्ट केला नाही, कारण ते आमचे काम नाही. सेटवर काय होत आहे ते आम्ही त्यांना रिपोर्ट देत होतो, त्यानंतर रमेशजी यांनी माझं आणि अमजदचं नाव घेतलं होतं.
शोले सिनेमानंतर मिळालेल्या ब्रेकबद्दल सांगताना अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, शोले सिनेमामुळेच मला ब्रेक मिळाला होता. शोले सिनेमा सुरु असतानाच गीत गाताचं शूटींग सुरु होते, त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. राजश्री प्रोडक्शनचे कर्ताधर्ता ताराचंद बडजात्या ते काही भागांमध्ये शोले सिनेमा विकत होते. त्यांनी तो पिक्चर विकत घेतला होता, जेव्हा रामनगरमध्ये म्हणजेच ज्याठिकाणी सिनेमाचे शूटींग सुरु होते. त्यावेळी ते त्याठिकाणी व्हिझिट करण्यासाठी आले होते, त्यावेळी आम्ही सर्व ताराचंद बडजात्यांना भेटलो होतो आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले होते. त्यावेळी मी ते आले तेव्हा मी कोपऱ्यामध्ये होतो उभा.
पुढे अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, त्यावेळी मला फार कोणी ओळखत नव्हते. त्यावेळी धमेंद्र, हेमा मालिनी यांसारखे दिग्गज कलाकार त्याठिकाणी होते. जेव्हा ते आले होते त्यावेळी मरणाचा माझा सिन त्याठिकाणी सुरु होता. सगळे दिग्गज कलाकारांसोबत ते उभे राहिले आणि त्यावेळी त्यांनी तो फोटो काढला. फोटो काढताना मी कोपऱ्यामध्ये उभा होतो, त्यावेळी सगळे त्यांचे आभार मानत होते. त्यावेळी अचानक ताराचंद बडजात्या म्हणाले की 'एक फोटो हिरोसोबत काढायचा आहे' अनेकांना प्रश्न पडला की आता नक्की हिरो कोण आहे? कारण अमिताभ बच्चन, धमेंद्र हे सगळे त्याठिकाणी उभे होते.
पुढे ते म्हणाले की, कोणालाच समजले नाही, त्यावेळी त्यांनी माझ्याकडे इशारा केला आणि त्या हिरोसोबत मला फोटो काढायचा असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मी घाबरलो आणि त्यांनी मला बोलावले आणि त्यांनी माझा फोटो काढला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या भावांच रिसेप्शन होते, या कार्यक्रमाला आम्हाला बोलावले होते. तेथे बडजात्यांचे दुसरे सुपुत्र राजकुमार बडजात्या हे तेथे होते. ते मला त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, सचिनजी मला तुमच्यासोबत एक सिनेमा करायचा आहे. माझ्या वडिलांची इच्छा आहे.