Exclusive : 'अशी ही बनवाबनवी' ते 'शोले'! सचिन पिळगावकरांनी 60 वर्षातील सिनेमा सृष्टीतील सांगितल्या खास आठवणी
झी 24 तासच्या लोकप्रिय शो टू द पॅाइंटमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर यांची एक्सलुसिव्ह मुलाखत पार पडली आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्याच्या 60 वर्षाच्या या जुन्या आठवणीबद्दल सांगितले आहे.
अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखले जातात, त्यामुळे अनेकदा ते चर्चेत पाहायला मिळतात. झी 24 तासच्या कमलेश सुतार यांच्या लोकप्रिय शो टू द पॅाइंटमध्ये एक्सलुसिव्ह मुलाखत पार पडली आहे यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मागील 60 वर्षापासून सिनेमा सृष्टीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांनी दमदार सिनेमे केले आहेत. ब्लॅक अॅड व्हाईट सिनेमापासून अभिनेते सचिन पिळगावकर यांनी काम केले आहे, त्यांचे अनेक सिनेमे हे अजूनही प्रेक्षक पाहत असतात. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्याच्या 60 वर्षाच्या या जुन्या आठवणीबद्दल सांगितले आहे.
पिळगावकर यांची सुरुवात ब्लॅक अॅड व्हाईट सिनेमापासून झाली होती, त्यांनी मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ त्याचबरोबर डाऊनफॅोल देखील त्यांनी पाहिला आहे. रमेश सिंपी हे सचिन पिळगावकर यांचे गुरु आहेत त्यांनी त्याच्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. मनोज कुमार त्याचबरोबर मनमोहन देसाई त्यांची कामे पाहून सचिन पिळगावकर यांनी सिनेमा सृष्टीमध्ये बरेच काही शिकले आहेत. वयाच्या 4 वर्षापासून सचिन पिळगावकर यांनी अभिनयाला सुरुवात केली होती आणि 1982 मध्ये त्यांनी पहिला सिनेमा मायबाप नावाचा दिग्दर्शित केला होता. सचिन पिळगावकर यांनी 1962 पासून अभिनयाला सुरुवात केली होती, हा सिनेमा 1963 साली रिलीज झाला होता.
हे ही वाचा
अनिरुद्धची भविष्यवाणी ठरली खरी! IPL टीमच्या मालकिणीसोबत लवकरच वाजणार शहनाई
सचिन पिळगावकर यांनी त्याच्या सिनेमाच्या करिअरबद्दल सांगताना ते म्हणाले की, 1962 सालापासून एकही वर्ष असे गेले नाही की मी त्यामध्ये काम केले नाही. एवढेच नाही तर लॅाकडाऊनमध्ये सुद्धा मी काम करत होतो, त्याचा मला खुप अभिमान आहे नशीब देखील असायला पाहिजे. सिनेमामध्ये येणे ही कोणाची आवड होती, यावर अभिनेते म्हणाले की, अभिनय करणे किंवा अभिनेता होणे ही सचिन पिळगावकर यांची आवड होती. याहू चाहे मुझे कोई जंगली कहे या गाण्यापासून मी सुरुवात केली होती, या गाण्यावर अभिनेत्याचे पाय थिरकायला लागले.
जेव्हा सिनेमाची ऑफर आली तेव्हा मला करायचा आहे असे मी सांगितले आणि त्यानंतर ते सुरुच राहिले. अनेक हिंदी सिनेमामधील मोठ्या कलाकारांसोबत सचिन पिळगावकर यांनी काम केले आहे. हिंदी सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांना बालकलाकार म्हणूनच सिनेमा मिळाला होता. त्यावेळी सिनेमा तयार करण्याची संख्या फार कमी होती असे अभिनेत्याने सांगितले.