'दाऊदने सलमान नावाचा कुत्रा पाळलाय, संपूर्ण कुटुंबाला...'; लॉरेन्स गँगकडून सलमानला पुन्हा धमकी; तर संपूर्ण बॉलिवूडला दिला इशारा, 'पुढचा नंबर...'
अभिनेता टायगर श्रॉफवर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. हल्ल्यानंतर एक ऑडिओ क्लिप शेअर करत यातून पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबईतील जुहू परिसरात एका कामानिमित्त गेलेल्या बॉलिवूड अभिनेता आणि जॉकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला. कारमधून जात असताना अभिनेत्यावर जीवघेण्या हल्ल्या झाला. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, टायगर श्रॉफच्या गाडीवर चार ते पाच राऊंड फायरिंग करण्यात आलं. या हल्ल्यामध्ये टायगर श्रॉफला गोळी लागली नसून तो सुरक्षित आहे. तर टायगर श्रॉफचा कारचालक जखमी झाला आहे. तसाच एक रिक्षाचालकही जखमी झाला आहे. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान गोळीबारानंतर लगेचच लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत जबाबदारी घेण्यात आली आहे. यामध्ये टायगर श्रॉफवर हल्ला का करण्यात आला याबदद्ल सांगण्यात आलं आहे. त्यासोबत या ऑडिओ क्लिपमधून पुन्हा एका सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा - टायगर श्रॉफवरील गोळीबार कोणी आणि का केला? सगळ्यात मोठी अपडेट समोर
ऑडिओ क्लिपमध्ये काय धमकी देण्यात आली?
लॉरेन्स गँगचे सदस्य असलेले परदेशी गुंड अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑडिओमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व भावांना राम. मी, अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोई यांचा छोटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफसोबत जे काही घडले, त्याची जबाबदारी मी, अनिल पंडित आणि माझा मोठा भाऊ, अरमान संधू, घेतो. आम्ही त्याला समजावून सांगितले, पण त्याला समजले नाही. संपूर्ण बॉलिवूडमध्ये जो आम्हाला सोडून काम करेल किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याला मारून टाकू आम्ही. आणि हा पहिली आणि शेवटचा इशारा आहे. हा सलमान खान दाऊदचा कुत्रा आहे आणि आम्ही घरी दाऊद नावाचा कुत्रा ठेवला आहे.
नीट ऐक सलमान खान. जर तू माझा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई किंवा बिश्नोई समाजाची माफी मागितली नाहीस, तर आम्ही तुझ्या घरात एक कुत्रासुद्धा ठेवणार नाही. आम्ही तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू. ही गोष्ट डोक्यात ठेव. जर तुला वाटत असेल की सुरक्षित आहे आणि तुमचे काही होणार नाही. आम्ही तुमच्या सुरक्षेच्या मर्यादेतच तुमचा बंदोबस्त करू, हे संपूर्ण जग लक्षात ठेवेल. त्याशिवाय, काही कुत्रे आमच्या भावाच्या विरोधात भुंकत आहेत, ते प्रसिद्धीसाठी भुंकतात. तुम्हीही तयार राहा, याला थोडा वेळ लागू शकतो, पण प्रत्येकाची वेळ येईलच.
कोण आहे अनिल पंडित?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑडिओ क्लिपमधून धमकी देणारी व्यक्ती, अनिल पंडित आहे. तो सध्या अमेरिकेत असून तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या नावावर अनेक गुन्हांची नोंद असून अनेक हल्ल्यांची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. तो लॉरेन्स बिश्नोईचा सर्वात जवळचा विश्वासू मानला जातो. तर त्याचा साथीदार अरमान संधू, हा देखील दुसऱ्या देशात आहे.