SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफवर 10 दिवस ठेवण्यात आली पाळत, जीम आणि घराची केली होती रेकी; ते तिघे आरोपी कोण? ओळख पटली

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी 10 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली होती. तसंच त्याचं घर आणि जीमची रेकी केली होती अशी सूत्रांची माहिती आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 19, 2026, 01:27 PM IST | Updated: Oct 19, 2026, 02:02 PM IST
Image Credit: टायगर श्रॉफवर 10 दिवस ठेवण्यात आली पाळत
Join

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी 10 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली  होती. तसंच त्याचं घर आणि जीमची रेकी केली होती अशी सूत्रांची माहिती आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू भागात हा हल्ला झाला. रविवारी संध्याकाळी फुटबॉलच्या मैदानावरून घरी परतत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तीन व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. टायगरच्या कारवर एकूण सात गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्या चुकल्या.

पाचवी गोळी झाडल्यानंतर, एक हल्लेखोर कारच्या जवळ आला आणि त्याने अगदी जवळून टायगर श्रॉफवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जॅम झाल्याने गोळीबार होऊ शकला नाही. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सुपारी दिलेले हल्लेखोर, रेल्वेने प्रवास करत असताना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून पकडले गेले. आरोपींपैकी दोघे हरियाणाचे आहेत, तर एक जण बिहारचा रहिवासी आहे.
हल्लेखोरांनी अभिनेत्याच्या घरी आणि जिममध्ये रेकी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जवळपास 10 दिवसांपासून ते श्रॉफच्या हालचाली आणि वेळापत्रकाचा मागोवा घेत होते. आरोपी पापाराझींच्या व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील ब्लॉगर्सच्या माध्यमातून टायगर जात असलेल्या ठिकाणांची माहिती घेत होते.

आरोपी, ज्यापैकी एक अल्पवयीन आहे, त्यांच्या हँडलर्सच्या व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपद्वारे सतत संपर्कात होता. या ॲप्सच्या माध्यमातून गुन्हेगारी ठिकाणाचे लोकेशनही त्यांच्यासोबत शेअर करण्यात आले.

आरोपी कोण आहेत?

रेहान (18) हरियाणातील सोनीपत आणि रितिक (22) असून मूळचा बिहारमधील बेगुसराय येथील आहे. तिसरा संशयित हरियाणाचा अल्पवयीन आहे.
 

तिन्ही शूटर्सना अटक केल्यानंतर तपासात महत्त्वाची माहिती

हँडलरच्या संपर्कात होते तिन्ही आरोपी
तिन्ही आरोपी एका कथित हँडलरच्या संपर्कात होते. सिग्नल आणि टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून त्यांच्यात सातत्याने संदेशांची देवाणघेवाण आणि लोकेशन शेअर केले जात होते.

हँडलर अनिल पंडित होता का? 
तिन्ही शूटर्सच्या संपर्कात असलेला हँडलर अनिल पंडित होता की त्याचा एखादा जवळचा साथीदार, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

रेहानचा अनिल पंडितशी संपर्क
तपासादरम्यान रेहानचा अनिल पंडितशी संपर्क असल्याचे दर्शवणारे डिजिटल पुरावे तपास यंत्रणांना मिळाल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलाचा सहभाग
रेहानच्या सांगण्यावरून सोनीपत येथील एका अल्पवयीन मुलाचा कथित कटात सहभाग झाल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.

ऋतिकने केली लॉजिस्टिक व्यवस्था
मुंबईत आधीपासून उपस्थित असलेल्या ऋतिकने अल्पवयीन शूटर आणि रेहान यांना आवश्यक लॉजिस्टिक मदत पुरवल्याचा आरोप आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES