टायगर श्रॉफवर 5 राऊंड फायरिंग! हल्ल्याची जबाबदारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई कोण?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडितने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई कोण आहे यासंदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत.
रविवारी मुंबईच्या उच्चभ्रू जुहू परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथील पुष्पा पार्कजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. या खळबळजनक घटनेत अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, मात्र गोळीबारात काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारामागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी पोलिसांनी पुष्पा पार्क आणि आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडितने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणारा एक व्यक्ती म्हणतो, "सर्व भावांना राम-राम, मी अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफसोबत जे काही घडले, त्याची जबाबदारी मी, अनिल पंडित आणि माझा मोठा भाऊ, हरमन संधू, घेतो. आम्ही त्याला सर्व समजावून सांगितले, पण त्याला समजले नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टीत जो कोणी आमच्यापासून वेगळे काम करेल किंवा सलमानसोबत मिळून काम करेल, त्याला आम्ही ठार मारू. हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे." असे या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. आता लॉरेन्स बिश्नोई गँग कोण आहे यासंदर्भात जाणून घ्यायला सर्वच उत्सुक आहेत.
हे ही वाचा
'शोले'च्या सेटवर फोटोचा किस्सा आणि लीड रोल... सचिन पिळगावकर भरभरून बोलले!
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई गँग ही मागील काही वर्षापासून सातत्याने चर्चेत पाहायला मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोई ही एक व्यक्ती आहे, जी तुरुगांत आहे पण त्यांच्या नावाने अनेकदा सलमान खान त्याचबरोबर अनेक मोठ्या सेलिब्रेटींना धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या लॉरेन्स बिश्नोई गँगने इमेलच्या माध्यमातून देखील धमक्या आणि हत्या करण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात 2010 पासूनच झाली होती, यावेळी त्याने अतिक्रमण, हल्ला आणि दरोडा अशा प्रकारचे गुन्हे केले होते.
मागील काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई हा तुरुंगात असताना, बिश्नोईने इतर कैद्यांशी युती करुन त्यांच्यांशी मैत्री केली आहे, ज्यामुळे त्याच्या टोळीच्या वाढीस हातभार लागला. सुटकेनंतर, त्याने शस्त्र विक्रेत्यांशी संबंध जोडले आणि आपल्या गुन्हेगारी कारवायांचा विस्तार केला.