टायगर श्रॉफ : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसानी काही आरोपींना अटक केली असून तपासात नव नवीन अपडेट समोर येत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना टायगर श्रॉफने मोठी प्रॉपर्टी डील केली आहे. टायगरने आपला मुंबईतीलआलिशान फ्लॅट कोट्यावधी रुपयांना विकला आहे. 9 कोटी रुपयांना डील झाली असून टायगरला 18 टक्के प्रॉफीट मिळाले आहे.
रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सकडून या डीलबाबत माहिती मिळाली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या मालकीचा मुंबईतील खार वेस्ट येथे एक आलिशान अपार्टमेंट 9 कोटी रुपयांना विकला आहे. 22 ऑक्टोबर, 2026 या व्यवहाराची नोंदणी झाली होती.
मुंबईतील खार येथील रुस्तमजी पॅरामाउंट डी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नवव्या मजल्यावर टायगर श्रॉफच्या मालकीचा फ्लॅट होता. या फ्लॅटचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ 1,291.14 चौरस फूट आहे. टायगर श्रॉफने 2018 मध्ये हा फ्लॅट 7.60 कोटींना खरेदी केली होती. आता, 2026 मध्ये टायगरने हा फ्लॅट 9 कोटींना विकला. टायगरने या डीलमधून 1.39 कोटींचा मोठा नफा कमावला आहे. फ्लॅटमध्ये 95.80 चौरस फूट स्वतंत्र जागेचाही समावेश आहे. फ्लॅटसोबत खरेदीदाराला बेसमेंट 2 मध्ये दोन झाकलेल्या कार पार्किंगच्या जागाही देण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी टायगरने आणखी एक अपार्टमेंट 15.6 कोटी रुपयांना विकला होता. 2026 च्या सुरुवातीला, त्याने पुण्यातील हडपसर येथील एक आलिशान मालमत्ता 8.87 कोटी रुपयांना विकली होती.
18 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील जुहू येथील पुष्पा नरसी पार्कबाहरे टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. बाईकवरून आलेल्या तीन तरुणांनी त्याच्या कारवर गोळीबार केला. टायगर या गोळीबारात किरकोळ जखमी झाला. या गोळीबारात त्याचा ड्रायव्हर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले.
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्या प्रमाणे 26/11तील दहशताद्यांना त्यांचे हँडलर्स फोनवरुन अपडेट्स देत होते त्याच प्रमाणे टायगर श्रॉफ गोळीबारातील आरोपींनाही त्यांचे हँडलर्स गोळीबारानंतर फोन आणि मेसेजद्वारे अपडेट्स देत होते अशी माहिती समोर आली. बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट पाहून आरोपींना पोलिसांच्या तपासाची अपडेट्स वेळोवेळी दिली जात होती अशी माहिती समोर आली. आरोपींचे फोटो टीव्हीवर झळकताच एका शूटरला “चेहरे आ गए हैं, निकल जाओ”. असा मेसेज हैंडलरने केल्याचं ही समोर आलं. दरम्यान टायर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी पूल सिंग, रेहान अन्सारी आणि रिथिक महतो यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक झालीये.. या शूटर्सना अपडेट्स देणारा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.