SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा, तो हल्लेखोर...

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफची गाडी बुलेटप्रूफ नव्हती. तसंच हल्लेखोरांचा हत्या करण्याचा हेतू होता असा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 19, 2026, 07:21 PM IST | Updated: Oct 19, 2026, 07:28 PM IST
Image Credit: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद
Join

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफची गाडी बुलेटप्रूफ नव्हती. तसंच हल्लेखोरांचा हत्या करण्याचा हेतू होता असा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. गाडीवर गोळीबार करण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे हल्लेखोर घटनास्थळावर होते. दोन बाईकवरून तीन लोक आले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीमध्ये कोणीही अल्पवयीन नसल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे.

आधी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक जण हरियाणातील सोनीपत येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा होता. मात्र तो अल्पवयीन नसल्याचं आता पोलिसांनी सांगितलं आहे. इतर दोघांची ओळख पटली असून, त्यात बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी असलेला 22 वर्षीय रितिक कुमार ऊर्फ रोशन (जो सध्या मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात राहतो आणि 'रॅपिडो' रायडर म्हणून काम करतो) आणि हरियाणातील सोनीपतचा 18 वर्षीय रेहान आहे.

तीन आरोपींपैकी दोघे कथितरित्या भाडोत्री हल्लेखोर होते, तर तिसऱ्या व्यक्तीने हल्ल्यानंतर त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे. आरोपी गोळ्या झाल्यानंतर अंधेरीकडे गेले.
तिथून ते रस्तेमार्गे सुरतला गेले आणि सुरतवरून त्यांनी पुणे जयपूर एक्सप्रेस पकडली.

 

 

मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी सांगितले की, "गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने सुमारे 20 विशेष पथके तयार केली होती. प्रत्यक्ष पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पथकांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शोधून काढली आणि आरोपींचा मागोवा घेत त्यांना सुरतपर्यंत गाठले. तिथून त्यांनी पुणे-जयपूर एक्सप्रेस पकडली होती. ते ज्या डब्यात (कोचमध्ये) प्रवास करत होते, त्याची ओळख पटवण्यात आली आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामगिरीत आम्हाला दिल्ली, गुजरात आणि राजस्थान पोलिसांचे सहकार्य मिळाले. आमचे सांघिक प्रयत्न, प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या जोरावर आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. सुरुवातीला, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जसे जसे नवीन पुरावे समोर येतील आणि इतर आरोपींची ओळख पटेल, तसतसे यात सामील असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना अटक केली जाईल."

राजस्थान, गुजरात आणि दिल्ली पोलीस यांच्या मदतीने त्यांना कोटा इथं पकडण्यात आलं आहे. तसंच मुंबई पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. लवकरच त्यांना मुंबईत आणले जाईल यादरम्यान जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती आणि जुन्या ऑ़डिओ क्लिप यातील आवाज मिळते जुळते वाटत असल्याचा पोलिसांचा अंदज आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या लोकांचे आवाज इतर राज्यातील धमक्यांच्या ऑडिओ क्लिपसोबत मॅच होताहेत का हे तपासण्याचे काम सुरू आहे

आरोपींनी फायरिंग नंतर पिस्तुल फेकून दिले असल्याचा अंदाज आहे. मागील 20 दिवसापासून आरोपी मुंबईत होते. मागील रविवारी त्यांनी मैदानाची रेकी केली होती. मागील रविवारच्या सीसीटीव्ही फुटेज मध्येही ते दिसत आहेत . 11 सप्टेंबरला त्यांनी बाईक घेतली होती, पण ती कुटून आली होती याची माहिती घेतली जात आहे. ही बाईक सध्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES