Explaine : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट! गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळतोय
गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळत आहे. यामुळे भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे. जगातील सर्वात मोठी हिमनदी भारतापासून 12000 KM अंतरावर आहे.
World Largest Doomsday Glacier : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट घोघावत आहे. ही संकट दुसरं तिसरं कोणत नसून जगातील सर्वात मोठा ग्लेशियर आहे. 'थ्वेट्स' नावाची हमनदी अर्थात ग्लेशियर मेणासारखी वितळत आहे. हा ग्लेशियर गुजरात किंवा कर्नाटकच्या दुप्पट आकाराचा आहे. हा ग्लेशियर वितळला तर येत्या शतकात जागतिक समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे लहान बेट असलेल्या राष्ट्रांला तसेच भारतालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतातील समुद्र किनाऱ्यांवर शहरे पाण्याखाली जाऊ शकतात. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने निकोबार तसेच लक्षद्वीप बेटांनाही मोठा निर्माण होऊ शकतो.
हिमनदीशास्त्रज्ञांच्या एका पथकाने केलेल्या नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जगभरातील संशोधक तसेच पर्यावरण तज्ञ चिंतेत आहेत. पश्चिम अंटार्क्टिकामधील थ्वेट्स नावाची हिमनदी वेगाने घन अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतरित होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हे घडत असल्याचे संशोधकांचा दावा आहे. समुद्राचे गरम पाणी थ्वेट्सच्या पृष्ठभागाखाली शिरत आहे. यामुळे याचा गाभा वितळत आहे. या संशोधनातील सर्वात धक्कादायाक बाब म्हणजे जागतिक तापमानवाढीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नसला तरीही या ग्लेशियरमुळे समुद्राच्या पातळीत 1.2 इंच म्हणजेच जवळपास 30 मिमी वाढ होऊ शकते.
'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात या संदर्भातील अहवाल प्रकाशित झाला आहे. अनेक दशकांपासून आकुंचन पावत असलेली ही हिमनदी आता शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक वेगाने वितळत आहे. या संशोधनामुळे याबाबतच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीसोबत सहकार्याने याबाबतचे सखोल संशोधन केले. यासाठी या भागातील सॅटेलाईट मॅपिंग देखील करण्यात आले. या डेटाच्या मदतीने अनेक बाबींचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
थ्वेट्स हिमनदी पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी
थ्वेट्स हिमनदी पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी आहे. संशोधक या नदीला 'प्रलयकारी हिमनदी' असे संबोधतात. थ्वेट्स ही पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी असून अंदाजे 1,92,000 चौरस किलोमीटर अर्थात 74,130 चौरस मैल क्षेत्रफळ व्यापते. याचे एकूण आकारमान हे साधारणपणे गुजरात राज्याच्या आकाराएवढे आहे. पश्चिम अंटार्क्टिकाच्या दुर्गम प्रदेशातील मेरी बर्ड लँडच्या वॉलग्रीन किनाऱ्यावर ही हिमनदी वसलेली आहे.
विशाल पश्चिम अंटार्क्टिक हिमस्तराचा एक भाग आहे. यात थ्वेट्सपेक्षा 14 पट मोठ्या इतर हिमनद्यांचा समावेश आहे. या हिमनदीचा नकाशा सर्वप्रथम 1947 मध्ये तयार करण्यात आला. दिवंगत अमेरिकन हिमनदी तज्ञ फ्रेडरिक टी. थ्वेट्स यांच्या नावावरून याचे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांनी स्वतः कधीही या हिमनदीला भेट दिली नव्हती.
थ्वेट्स हिमनदी किती धोकादायक?
सर्वप्रथम 1980 च्या दशकात, संशोधनादरम्यान थ्वेट्स हिमनदी वेगाने वितळत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. सातत्याने याचे याचे संशोधन सुरु होते. संशोधक सातत्याने या नदीच्या वितळण्याच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तिच्या प्रचंड आकारामुळे, जर ही हिमनदी कोसळली, तर त्यामुळे जगभरात समुद्राची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. मात्र, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्यास अनेक दशके, कदाचित शतकेही लागू शकतात असा संशोधकांचा दावा आहे.
थ्वेट्स हिमनदी झपाट्याने का वितळत आहे?
थ्वेट्स हिमनदी झपाट्याने वितळण्यामागे वाढते तापमान हे प्रमुख कारण आहे. असे असले तरी यामागची अनेक कारणे संशोंधकांनी शोधून काढली आहेत. समुद्राच्या पाण्याची वाढती उष्णता हे देखील सर्वात चिंताजनक कारण मानले जात आहे. थ्वेट्स हिमनदी खालून वितळत आहे. समुद्राच्या तापमानातील वाढ ही मानवनिर्मित हवामान बदलामुळे, विशेषतः प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होत आहे.
2019 च्या एका अभ्यासात, नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने थ्वेट्स हिमनदीखाली एक मोठी पोकळी शोधून काढली. ही पोकळी 39.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेली आहे. हिमनदी वितळण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) नुसार, वाढत्या तापमानामुळे 2000 सालापासून हिमनदीचा सुमारे पाच टक्के बर्फ वितळला आहे.
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेच्या शास्त्रज्ञांनी एक वेगळाच निष्कर्ष काढला आहे. थ्वेट्समधील बर्फ किमान पुढील 150 वर्षे कमी होत राहील. समुद्राचे तापमान अत्यंत थंड झाले तरीही ही परिस्थिती कायम राहील असा या संशोधकांचा दावा आहे.