बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे नाव उघड! हल्लेखोराची हादरवणारी माहिती समोर
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सहवैमानिकाची ओळख पटली असून त्याबद्दल हादरवणारी माहिती समोर आली आहे.
'फ्लायदुबई'च्या FZ1073 या विमानात कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-पायलटबद्दल अनेक धक्कादायक आणि हादरवणारी माहिती समोर आली आहे. मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्येच प्राणघातक चाकूहल्ला करणाऱ्या संशयित सहवैमानिकाची अधिकृत ओळख आता समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आणि माध्यमांच्या माहितीनुसार, त्या सह पायलटचे नाव हमाल अल हमामी आहे. धक्कादायक म्हणजे एअर ओमानने त्याच्यावर बंदी घातली होती. धक्कादायक म्हणजे तिला अटक केल्यानंतर त्याच्या बॅगेतून फ्री पॅलेस्टाइनच्या पत्रकांसह विविध वस्तू सापडल्या आहेत.
कोण आहे आरोपी हमाम अल-हमामी?
संशयित हमाम अल-हमामी हा ओमानचा रहिवासी असून सुमारे वर्षभरापूर्वीच तो 'फ्लायदुबई' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू झाला होता.
विमान आकाशात असताना हमामीने अचानक सोबत आणलेल्या मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. त्याचा उद्देश कॅप्टनना पूर्णपणे निष्प्रभ करून १८० प्रवाशांसह असलेल्या 'बोईंग ७३७ मॅक्स ८' विमानाचा ताबा मिळवणे आणि ते क्रॅश करणे हा होता, असा संशय त्यांना आहे.
शरीरावर गंभीर वार झाले असतानाही मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःचा तोल सावरला, कॉकपिटचा दरवाजा उघडून केबिन क्रू आणि प्रवाशांची मदत घेतली आणि अल-हमामीला रोखून धरले. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केलं.
आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तीव्र तणावाच्या काळात एका इस्रायली प्रवाशांनी भरलेल्या विमानाला लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न पूर्वनियोजित होता का, तसंच अल-हमामीचे कोणत्याही दहशतवादी वा कट्टरतावादी विचारसरणीशी संबंध आहेत का, याचा कसून तपास करण्यात येत आहे.
विमानाचे लँडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आरोपी हमाम अल-हमामीला तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, हत्येचा कट आणि दहशतवादी कलमांन्वये कारवाई सुरू आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्यामुळे ९/११ सारखा भीषण कट टळला असून, आरोपी हमाम अल-हमामीच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास केला जातोय.