SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एक पत्रकार अचानक देशाचा राजा बनला; युगांडाच्या 13 व्या राजाची रंजक कहानी

एक पत्रकार देशाचा राजा बनला आहे. युगांडाच्या 13 व्या राजाची रंजक कहानी सध्या जगभरात चांगलीच चर्चेत आली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Sep 30, 2026, 09:20 PM IST | Updated: Sep 30, 2026, 09:28 PM IST
Join

एडवर्ड रुकिडी : जगात अनेक देशांमध्ये राजेशाही सुरु आहे. राजेशाही परिवाराकडे देशाची सत्ता असते. याच परिवारातील व्यक्तीकडेच सिंहासन जाते. सध्या युगांडा देशात नव्या राजाच्या हातात सत्ता गेली आहे. युगांडाच्या 13 व्या राजाची कहानी  अतिशय रंजक  आहे.   एक पत्रकार देशाचा राजा बनला आहे. 

युगांडाचे 56 वर्षीय एडवर्ड रुकिडी कियानांगोमा हे आता तोरो राज्याचे नवीन राजे बनले आहेत. 29 सप्टेंबर रोजी फोर्ट पोर्टल येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. एडवर्ड रुकिडी यांना न्याबोंगो हे नवीन मिळाले आहे.  एडवर्ड रुकिडी तोरो समाजाचे 13 वे राजे बनले.  पत्रकार ते राज असा एडवर्ड रुकिडी यांचा प्रवास आहे.  सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी, रुकिडी यांची एक वेगळी ओळख होती. ते युगांडाच्या सरकारी प्रसारक वाहिनीसाठी दीर्घकाळ वृत्त निवेदक आणि संपादक होते.

यशस्वी पत्रकार

एडवर्ड रुकिडी यांनी  दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेची कारकिर्दीत गाजवली आहे.  त्यांनी शेजारील रवांडामध्ये प्रसारण क्षेत्रातही काम केले. रुकिडी यांचा राजघराण्याशी दीर्घकाळचा संबंध असून, त्यांची मुळे तोरोच्या बाबितो राजघराण्यात आहेत. ते दिवंगत राजकुमार क्रिस्टोफर पॉल किजानांगोमा यांचे पुत्र आणि माजी राजा सर जॉर्ज डेव्हिड रुकिडी यांचे नातू आहेत. दिवंगत राजा ओयो न्यिंबा काबांबा इगुरु रुकिडी हे त्यांचे चुलत भाऊ होते.

फोर्ट पोर्टलजवळील किडुकुरु गावात एडवर्ड रुकिडी यांचे बालपन गेले. त्यांनी मेकेरे विद्यापीठात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पत्रकारितेला करिअर म्हणून निवडले. राजा ओयोच्या मृत्यूनंतर सिंहासनाचा मार्ग मोकळा झाला.

27 ऑगस्ट रोजी, अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत असताना 24 वर्षीय राजा ओयो यांचे निधन झाले. ओयो 1995 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी राजे बनले. ते दीर्घकाळ 'बाल राजा' म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे पुढील राजाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला.

राजा ओयो यांच्या आई, बेस्ट केमिगिसा आणि बहीण, राजकुमारी रूथ कोमुंताले यांनी सांगितले की, ओयो यांनी त्यांच्या 2022 च्या मृत्युपत्रात एका धाकट्या मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. तथापि, त्या मुलाची ओळख सार्वजनिकरित्या उघड करण्यात आली नाही. दरम्यान, 21 सदस्यीय बाबितो शाही समितीने रुकिडी यांची नवीन राजा म्हणून निवड केली.

राज्याभिषेकामुळे ओळख बदलली

29 सप्टेंबर रोजी पारंपरिक समारंभांमध्ये रुकिडी यांचा राज्याभिषेक झाला. सिंहासनासाठी मध्यरात्रीपासून पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या एका प्रतिकात्मक लढाईत ते कारुझिका राजवाड्यापर्यंत चालत गेले. त्यांचे राजेशाही नाव एडवर्ड रुकिडी न्याबोंगो होते. युगांडामध्ये राजाकडे राजकीय सत्ता नसते. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, युगांडाने 1960 च्या दशकात पारंपरिक राजेशाहीवर बंदी घातली होती, परंतु 1993 येथे पुन्हा राजेशाही अस्तित्वात आली.  राजाला पारंपरिकरित्या सांस्कृतिक संरक्षक मानले जाते. समाजावर राजाचा मोठा प्रभाव असतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES