SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कॅनडातील कंपनीने 52,878 कोटींना विकत घेतली IDBI Bank; कंपनीच्या मालकाचे नाव जाणून शॉक; फक्त 64 रुपये घेऊन सोडला होता भारत

कॅनडातील फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज कंपनीच्या मालकाने काही वर्षांपूर्वी फक्त 64 रुपये घेऊन भारत सोडला होता. आता याच व्यक्तीने 52,878 कोटींना IDBI Bank विकत घेतली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 18, 2026, 05:18 PM IST | Updated: Oct 18, 2026, 05:25 PM IST
Join

IDBI Bank :आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकण्यास केंद्र सरकारने  मंजुरी दिली आहे. कॅनडातील कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज (Fairfax Financial Holdings) या कंपनीने IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. भारत सरकार आणि फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज  कंपनीसोबत 52,878 कोटींचा करार झाला आहे.  भारतीय बँकिंग क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील मानली जात आहे. फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज या कंपनीच्या मालकाचे नाव जाणून शॉक व्हाल. या कंपनीच्या मालकाचे भारतासह खास कनेक्शन आहे. 

मागील अनेक वर्षांपासून  IDBI बँकेच्या खासगीकरणाची चर्चा सुरु आहे. अखेर केंद्रीय मंत्री मंडळाने IDBI बँकेतील हिस्सा विकण्यासा परवानगी दिली आहे. भारत सरकार आयडीबीआय बँकेतील 30.48 टक्के, तर एलआयसी 30.24 टक्के हिस्सा विकत आहे. भारत सरकारने कॅनडातील कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज कंपनीसोबत 52,878 कोटींचा करार केला आहे. 

IDBI Bank विकत घेणाऱ्या कंपनीचा मालक कोण आहे?

IDBI Bank विकत घेणाऱ्या कॅनेडियन वित्तीय कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज यां कपंनीच्या मालकाचे नाव  प्रेम वात्सा आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठी डील करणारे प्रेम वात्सा हे भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यावसायिक आहेत.  प्रेम वात्सा हे कॅनडाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जातात. 

प्रेम वात्सा  25,000 कोटींच्या संपत्तीचे मालक

प्रेम वात्सा  25,000 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.  प्रेम वात्सा यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायाचे साम्राज्य उभारले आहे.  हैदराबाद हे प्रेम वात्सा यांचे जन्मस्थान आहे.  कठोर परिश्रम,कल्पकता याच्या जोरावर प्रेम वात्सा यांनी प्रसिद्धी आणि अफाट संपत्ती मिळवली आहे.

प्रेम वात्सा यांनी शिक्षणासाठी भारतातून परदेशात गेले सोडला

प्रेम वात्सा उच्च शिक्षण घेण्यासाठी एक सामान्य विद्यार्थी म्हणून परदेशात गेले होते. 5 ऑगस्ट 1950 रोजी हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्रेम वात्सा यांचा जन्म झाला. 1971 मध्ये  प्रेम वात्सा यांनी प्रतिष्ठित आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यांच्या वडिलांनी त्यांना परदेशात व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेण्याचा आग्रह केला. चांगल्या संधींच्या शोधात वात्सा कॅनडाला गेले.  वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी एमबीएसाठी प्रवेश घेतला. या निर्णयाने त्यांच्या विचारांना आणि आयुष्याच्या दिशेला कलाटणी मिळाली.

घरोघरी जाऊन वस्तू विकल्या

प्रेम वात्सा यांनी  खिशात फक्त 64 रुपये घेऊन भारत सोडला. ते घरोघरी जाऊन उपकरणे विकायचे. प्रेम वात्सा यांचे सुरुवातीचे काही दिवस कॅनडामधील अत्यंत आव्हानात्मक होते. तो भारतातून कॅनडामध्ये आला तेव्हा त्याच्याकडे फक्त आठ कॅनेडियन डॉलर्स म्हणजेच त्यावेळचे फक्त 64 रुपये होते. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आणि नवीन देशात राहण्यासाठी त्यांनी एका घरगुती उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत काम सुरु केले. ते  घरोघरी जाऊन उपकरणे विकायचे. नोकरी करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 

1974 मध्ये, प्रेम वात्सा यांनी कॉन्फेडरेशन लाइफ इन्शुरन्स कंपनी ऑफ कॅनडा येथे स्टॉक पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विमा, जोखीम व्यवस्थापन आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमधील बारकावे त्यांनी लक्षपूर्वक शिकून घेतले. काही वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु केली. हॅम्बलिन वात्सा इन्व्हेस्टमेंट कौन्सिल्स लिमिटेडची नावाची कंपनी त्यांनी स्थापना केली.  गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्याचे काम करण्याचे काम त्यांची कंपनी करते. 1985 मध्ये, त्यांनी टोरोंटो-स्थित वित्तीय सेवा कंपनी, फेअरफॅक्स फायनान्शियल, अधिग्रहित केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES