SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमेरिकेत शाळेत गोळीबार! तीन विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू, हल्लेखोरांचं वय पाहून बसेल धक्का

लॉकडाउननंतर, बेंड-ला पाइन स्कूल डिस्ट्रिक्टने (Bend-La Pine School District) बसमधून विद्यार्थ्यांना एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे, जिथे कुटुंबे आपल्या मुलांना पुन्हा भेटू शकतील असे सांगितले आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 16, 2026, 07:39 AM IST | Updated: Oct 16, 2026, 07:43 AM IST
Image Credit: अमेरिकेत शाळेत गोळीबार! तीन विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू (Photo - Reuters)
Join

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात तीन मुले आणि शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या वायव्य भागातील ओरेगॉनमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत हल्लेखोरही मारला गेला आहे. 'बेंड' (Bend) पोलीस विभागाचे प्रमुख माईक क्रँट्झ यांनी पत्रकारांना सांगितले की, "मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 5, 8 आणि 11 वर्षे वयोगटातील तीन मुले आणि एका शिक्षकाचा समावेश आहे." पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली आहे. हल्लेखोराचं वय फक्त 16 वर्ष असून तो ओरेगॉनचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.

पोलीस प्रमुख माईक क्रँट्झ यांनी सांगितले की, "संशयित व्यक्ती 16 वर्षांची असून ती 'बेंड' येथील रहिवासी आहे. शाळेत प्रवेश करताना एका स्थानिक नागरिकाने त्याला पाहिले आणि त्याचा पाठलाग करत शाळेच्या आत जाऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान त्या नागरिकाने संशयितावर गोळ्या झाडल्या."

'बेंड' पोलीस विभागाच्या प्रवक्त्या शीला मिलर यांनी सांगितले की, सुरुवातीला एका कारवर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर काही मिनिटांतच, शाळेच्या आत एक हल्लेखोर घुसल्याचे अनेक फोन आले.

स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता हे फोन आले होते. यानंतर काही मिनिटातच पोलीस अधिकारी तिथे दाखल झाले. त्यानंतर त्यांना "गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे," अशी माहिती वॉकी टॉकीवरुन मिळाली.

CNN आणि CBS News या दोन्ही वृत्तवाहिन्यांनी, कायदा अंमलबजावणी यंत्रणेच्या हवाल्याने या घटनेत चार जणांचा, ज्यामध्ये तीन मुले आणि एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहेत. मिलर यांनी सांगितले की, 'सिल्व्हर रेल एलिमेंटरी' (Silver Rail Elementary) शाळेत 400 ते 450 मुले शिकतात आणि तिथे 40 हून अधिक कर्मचारी काम करतात.

गोळीबारानंतर शाळेत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. 'बेंड-ला पाइन स्कूल डिस्ट्रिक्ट'ने (Bend-La Pine School District) सांगितले की, पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहेत, जिथे कुटुंबे आपल्या मुलांना पुन्हा भेटू शकतील.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES