SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

World's Busiest Airport: 12 वर्षात पहिल्यांदाच दुबईची नंबर एकवरुन घसरण! पहिल्या स्थनावरील एअरपोर्टचं नाव तुम्ही ऐकलंही नसेल

गेल्या 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय वाहतुकीत दुबई प्रथम क्रमांकावर होते. मात्र आता अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता ज्या विमानतळाने पहिला क्रमांक पटकावला आहे त्याचं नावही तुम्ही यापूर्वी कदाचित ऐकलं नसेल.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 13, 2026, 07:37 AM IST | Updated: Oct 13, 2026, 07:57 AM IST
Image Credit: अचानक या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली (प्रातिनिधिक फोटो सौजन्य वृत्तसंस्थांकडून साभार)
Join

इराण आणि इस्रायल अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक विमान वाहतुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मध्य पूर्वेकडे वळल्याने जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दुबईची पिछाडीवर आले आहे. विशेष म्हणजे दुबईची जागा घेणाऱ्या विमानतळाचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेकांनी हे नाव यापूर्वी कधी ऐकलंही नसेल. सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये पहिलं स्थान दक्षिण कोरियाच्या इंचिओन आंतरराष्ट्रीय विमानतळाने पटकावलं आहे. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीची आकडेवारी लक्षात घेत हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरवण्यात आलं आहे.

किती प्रवाशांनी या विमानतळावरुन केला प्रवास?

इंचिओन विमानतळाने 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत 3 कोटी 84 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा दिली. 2001 मध्ये विमानतळ सुरू झाल्यापासून हे विमानतळ प्रथमच जगातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून आकडेवारीच्या आधारावर समोर पहिल्या स्थानावर आलं आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे युरोपकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आणि विमानांनी इंचिओन विमानतळाचा पर्याय निवडला आहे. तसेच चीन आणि जपानमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. गेल्या 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय वाहतुकीत दुबई प्रथम क्रमांकावर होते. हवाईबंदीमुळे यूएईच्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमधील 74 लाखांवरुन मार्चमध्ये 25 लाखांपर्यंत घसरली.

अव्वल तीन विमानतळं कोणती?

जगातील सर्वात व्यस्त विमानतळांचा विचार केला तर प्रवासी संख्येनुसार यावर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये लंडन हिथ्रो दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत  3 कोटी 77 लाख 90 हजार प्रवाशांनी लंडन हिथ्रो विमानतळावरुन प्रवास केला. त्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर सिंगापूरचे चांगी विमानतळ असून, याच कालावधीत त्याच्या टर्मिनलमधून 3 कोटी 40 लाख ५३ हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केला आहे.

सर्व व्यस्त विमानतळावरुन किती ठिकाणी जातात विमानं?

लंडनचे हिथ्रो विमानतळ 2024 मध्ये पाचव्या आणि 2025 मध्ये सातव्या क्रमांकावर होते, तर इंचिओन अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या क्रमांकावर होते. युरोपला जाताना पूर्वी दुबईमार्गे प्रवास करणारे काही प्रवासी आता इंचिओनमार्गे प्रवास करत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ट्रान्सफर प्रवाशांमध्ये 18 टक्यांनी वाढ झाली आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे विमानतळाला अधिक वाहतूक भार हाताळणेही शक्य झाले आहे. इंचिओन विमानतळ 158 आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सेवा देते. त्या तुलनेत, हाँगकाँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 139, शांघायचे पुडोंग 92, तर टोकियोचे नारिता 86 ठिकाणांना सेवा देते.

भविष्यातील योजना काय?

इंचिओन विमानतळ महामंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष किम बेओम-हो यांनी विमानतळाला मिळालेल्या या सन्मानासंदर्भात बोलताना, "इंचिओनला जगातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ बनवण्यासाठी सरकारचा पाठिंबा, जनतेचे प्रोत्साहन आणि विमानतळावर तैनात प्रत्येकाच्या कठोर परिश्रम घेणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत," असं म्हणत सर्वांचे आभार मानले आहेत. प्रवाशांच्या सोयीवर लक्ष केंद्रित करून स्पर्धात्मकता वाढवण्याची महामंडळाची योजना आहे, असंही किम बेओम-हो यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना स्पष्ट केलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES