चाप खाण्याची क्रेविंग होत आहेत? घरच्या घरी बनवा चमचमीत चाप
अनेकदा घरचे जेवण तेचतेच खाऊन अनेकदा आपण कंटाळलेलो असतो त्यामुळे आता घरच्याघरी कशी सोया चाप बनवायची याची रेसिपी सविस्तर वाचा.
अनेकदा घरचे जेवण तेचतेच खाऊन अनेकदा आपण कंटाळलेलो असतो त्यामुळे मग काही तरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असते. जर तुम्ही चापप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, 'चाप' हा शब्द ऐकताच तुमच्या मनात सर्वप्रथम मलई चाप, अफगाणी चाप किंवा मसाला चाप येतात. पण आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की आपण हॅाटेलमधील घरी मागवलेले किंवा खाल्लेल्या चापमध्ये रिफाइंड पिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचे पोट खराब होण्याची शक्यता देखील जास्त आहे, जर आपण बाहेरील पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची आवडती चाप खाणे सोडून द्यावे, कारण तुम्ही कोणत्याही रिफाइंड पिठाशिवाय सोयाबीन वापरून घरीच मऊ आणि रसरशीत चाप बनवू शकता. चला तर मग, घरीच आरोग्यदायी आणि चविष्ट सोयाबीन चाप कशी बनवायची ते शिकूया.
सोयाबीन चाप बनवण्यासाठी साहित्य
सोयाबीनचे तुकडे - ४०० ग्रॅम
मीठ – २ चमचे
मैदा - १५० ग्रॅम
बेसन – ५० ग्रॅम
दूध – ५० ग्रॅम
तळण्यासाठी पाणी, लाकडी काड्या आणि गरम तेल
सोयाबीन चाप बनवण्याची कृती
सोयाबिन चाप बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून 400 ग्रॅम सोयाबीन घालून किमान ते पाणी 4-5 मिनिटे उकळवा आणि सोयाबीन मऊ होईपर्यत ठेवा. सोयाबीन मऊ झाल्यानंतर आता ही उकडलेली सोयाबीन पुरी थंड पाण्याने फेस येणे थांबेपर्यंत धुवा. त्यानंतर सोयाबीनमध्ये असलेले पाणी चांगले पिळून घ्या, त्याचे कारण म्हणजेच त्यामधील पाणी पूर्णपणे निघून जाणे गरजेचे आहे आणि ते नंतर गिळगिळीत होऊ नये. नंतर या सोयाबीन मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या आणि पुऱ्या वाटून झाल्यावर त्यात 150 ग्रॅम मैदा आणि 50 ग्रॅम बेसन घाला. आता हे तयार केलेले मिश्रण कणकेप्रमाणे सुमारे 3 ते 4 मिनिटे मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर त्यात सुमारे 50 ग्रॅम दूध घालून ते पुन्हा मळून घ्या.
सोयाबीनचे तयार झालेले मिश्रण पीठ झाकून ठेवा आणि सेट होण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता दुसऱ्या बाजूला लाकडी काड्या पाण्यात भिजवा, म्हणजे कमान त्यांना सहज चिकटेल. यानंतर तयार केलेल्या पिठाचा गोळा बनवा आणि तो पातळ लाटा आणि त्याच्या पट्ट्या कापून घ्या. या पट्ट्या लाकडी काड्यांवर एक एक करून गुंडाळा. त्यानंतर तयार झालेले हे सोया चाप काही तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवा साधरणत: 4 ते 5 तास फ्रीझरमध्ये ठेवा. काड्या पाण्यात चांगल्या उकळल्यानंतर थंड करा आणि थंड झाल्यावर काड्यांपासून सहजपणे वेगळे करून त्याचे लहान तुकडे करा. आता एका कढईत तेल गरम करा आणि चापचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. आता तुम्ही ते तुमच्या आवडत्या ग्रेव्हीमध्ये घालून बनवू शकता.