SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कांद्याची सालं फेकून देऊ नका, केसासाठी या तीन पद्धतीने करा वापर, कोंडा व केसगळतीही थांबेल

कांद्याचा वापर करुन तुम्ही केसांसाठी घरगुती तेल व हेअर डाय बनवू शकता. वाचा सविस्तर

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 02, 2026, 12:18 PM IST | Updated: Oct 02, 2026, 12:39 PM IST
Image Credit: hair health
Join

भारतीय जेवणात कांदा हा महत्त्वाचा पदार्थ आहे. कांद्याची फोडणी दिल्याशिवाय भाजी चविष्ट होऊच शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का कांद्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अनेक जण कांदा सोलून त्याची साले कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का कांद्याची साले तुमच्या केसासाठी फायदेशीर ठरू शकतात.

कांद्याच्या सालीत व्हिटॅमिन ए, सी आणि ई सह अँटी ऑक्सिडेंट्स, सल्फर आढळले जाते. ते केसांसाठी फारच फायदेशीर आहे. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला केसांसाठी कांद्याची सालं कशी वापरायची याबाबत सांगणार आहोत. यामुळं केसांची चमक पुन्हा मिळते आणि कोंडा निघून जाते.

केसांसाठी तेल बनवा

तुम्ही कांद्याच्या सालींपासून केसांची वाढ वाढवणारे तेल बनवू शकता. यासाठी, एका पातेल्यात खोबरेल तेल आणि कांद्याच्या साली घाला. दोन्ही घटक कमीतकमी 10-15 मिनिटे शिजवा, जोपर्यंत सालींचा रंग काळपट होऊ लागत नाही. यानंतर, तेल थंड होऊ द्या. ते गाळून एका बाटलीत साठवून ठेवा. हे तेल आठवड्यातून दोनदा तुमच्या टाळूला आणि केसांना लावा. 2-3 तासांनंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस मजबूत होतात.

केसांसाठी डाय बनवा

हेअर डाय बनवण्यासाठी, एका कढईत कांद्याची साले घालून तेलाशिवाय परतून घ्या. साले पूर्णपणे करपून काळी होईपर्यंत परतत राहा. नंतर, या काळ्या सालींची पूड करा. या पूडमध्ये १ चमचा कोरफडीचा गर (अ‍ॅलोवेरा जेल) घालून पेस्ट बनवा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरेल तेलही वापरू शकता. ही पेस्ट ब्रशच्या साहाय्याने केसांना लावा. एक ते दीड तासानंतर केस धुवा. नियमित वापरामुळे केस काळे होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक येते.

कांद्याच्या सालीचे पाणी

एका पातेल्यात 2 ग्लास पाणी आणि कांद्याची साले घाला. दोन्ही घटक किमान 20 मिनिटे चांगले शिजवा. पाण्याचा रंग हलका तपकिरी होईल. रंग बदलल्यावर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. आता, या पाण्याने आपले केस आणि टाळू पूर्णपणे स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक येईल आणि कोंडा घालवण्यासही मदत होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES