Maharashtra Breaking News Today LIVE: महिलेच्या अंगावर झोपणे आणि तोंड दाबणे अत्याचाराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 15 October 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 15 October 2026 : सीजेपीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपी तिरंगा आंदोलन करणार आहे. तिरंगा आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. दुसरीकडे CJP चे नेते आंदोलनावर ठाम आहेत. CJP नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर, महाराष्ट्रात देखील दुष्काळ जाहीर झाला आहे त्याअनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर, दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
15 Oct 2026, 8:07 PM
महिलेच्या अंगावर झोपणे आणि तोंड दाबणे अत्याचाराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
पाटणा हाय कोर्टाने आपल्या एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की कोणत्याही महिलेच्या अंगावर पडून तिचे तोंड दाबणे, जोपर्यंत शारीरिक संबंध ठेवण्याच्या दिशेने कोणत्याही स्पष्ट कृत्याचे पुरावे नसतील, भारतीय दंड संहितेच्या कलम 376/511 अंतर्गत दुष्कर्माच्या प्रयत्नाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही.
न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या न्यायालयाने 2013 च्या दोषसिद्धीविरोधात दाखल केलेले एक अपील अंशतः स्वीकारताना हे स्पष्ट केले की आरोपीचे हे कृत्य महिलेची लज्जा उत्पन्न करण्याच्या (आयपीसीच्या कलम 354) अंतर्गत येते.
न्यायालयाने यासोबतच कलम 448 अंतर्गत घरात घुसखोरीच्या शिक्षेला कायम ठेवताना दोषसिद्धीत बदल केला आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना 8 फेब्रुवारी 2010 ची आहे जी बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात घडली होती. तक्रारीनुसार, अपीलकर्ता मो. अनियुल हक रात्री सुमारे 10 वाजता एका विधवा महिलेच्या घरात शिरला जेव्हा ती झोपली होती.
महिलेचा आरोप होता की आरोपीने तिचे तोंड दाबले आणि तिच्या अंगाशी लगट केला. जेव्हा महिलेने आरडाओरड केली, तेव्हा ग्रामस्थ जमा झाले, ज्यांनी आरोपीला पकडून त्याला मारहाण केली. यानंतर पीडितेने 10 फेब्रुवारी 2010 रोजी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
बेगुसराय येथील ट्रायल कोर्टाने आरोपीला दुष्कर्माचा प्रयत्न (कलम 376/511) आणि घरात घुसखोरी (कलम 448) च्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत चार वर्षांच्या सक्त मजुरीची आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. ज्याच्या विरोधात याचिकाकर्त्याने हाय कोर्टात अपील दाखल केले होते.
हाय कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की जरी आरोपीने घरात प्रवेश करणे आणि महिलेचे तोंड दाबणे सिद्ध झाले असले, तरी त्याने कपडे काढले असल्याचा किंवा शारीरिक संबंध ठेवण्याच्या दिशेने कोणतेही कृत्य केले असल्याचा कोणताही पुरावा नाही.
हाय कोर्ट न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालांचा हवाला देत आरोपीच्या कृत्याला महिलेची लज्जा उत्पन्न करण्याच्या (कलम 354 आयपीसी) कक्षेत मानले.
आरोपीचे वय सुमारे 60 वर्षे असल्याचे पाहता, न्यायालयाने त्याच्या मुख्य शिक्षेला पूर्वी भोगलेल्या कालावधीपुरते मर्यादित केले आहे.
तथापि, पीडितेला न्याय देण्याच्या उद्देशाने त्याच्यावर 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो भरपाई म्हणून थेट पीडितेला मिळेल.
15 Oct 2026, 7:37 PM
गुजरातमध्ये कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; चार जणांचा मृत्यू
गुजरात : छत्राळ जीआयडीसी (GIDC) मधील कलर कंपनी मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गांधीनगरचे पोलीस अधीक्षक रवी तेजा वासमसेट्टी यांनी दिली.
15 Oct 2026, 5:56 PM
दिल्लीत थरार! भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
दिल्लीतील हत्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या झाली. गँगवॉरमधून हत्या झाल्याचा संशय आहे. दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरातील घटना आहे. शाहिद हुसेन उर्फ चोर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. चार आरोपींना अटक करण्यात आली.
दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरात शाहिद हुसेन उर्फ चोर याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असून, आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी तरुण उर्फ रंजनसह अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
दिल्लीच्या दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील कालिंदी कुंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम चौकाजवळ ही घटना घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शाहिदला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांच्या तपासानुसार, या हत्येमागे जुनं वैमनस्य असल्याचं समोर आलं आहे. २०२५ मध्ये तिहार तुरुंगात शाहिद आणि तरुण उर्फ रंजन यांच्यात वाद झाला होता. याच वादातून शाहिदच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी श्रीराम चौकाजवळ शाहिदला रस्त्यात अडवलं आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शाहिदचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चार आरोपींना अटक
या प्रकरणात करण उर्फ करम शाह, अबुजर, मोनू मलिक उर्फ साबिर आणि गौरव गुम्मा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यातील सहभाग, आरोपींना पळून जाण्यास मदत करणं आणि हत्येच्या कटातील कथित सहभाग अशा विविध बाबींच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणातील तरुण उर्फ रंजन, अमन आणि राजा यांच्यासह अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रं जप्त करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
या हत्येमागील नेमकं कारण आणि सर्व आरोपींची भूमिका निश्चित करण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
15 Oct 2026, 5:48 PM
अभिनेता इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस; हायकोर्टात जाणार
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला देश सोडण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. FRRO ने त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत भारताबाहेर जाण्याचे निर्देश दिले आहेत. या नोटीसीला आव्हान देण्यासाठी खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनात सहभागी झाल्याबद्दल खान यांना ताब्यात घेण्यात आले होते.
यानंतर भाजप नेते किरीट सोमैया यांनी गावदेवी पोलिसात तक्रार केली की, अमेरिकन नागरिक असलेले खान राजकीय मोर्चात सहभागी होऊन परदेशी कायद्याचे उल्लंघन करत आहेत. ही तक्रार FRRO कडे वर्ग करण्यात आली.
FRRO ने कारवाई करत खान हे OCI कार्डधारक असले तरी OCI ला राजकीय आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही आणि हा इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ चा भंग आहे, असे म्हणत हद्दपारीची नोटीस बजावली.
या याचिकेवर सरन्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे. खान यांच्यावतीने MZM लीगलचे अॅड. झुल्फिकार मेमन, परवेझ मेमन आणि चिराग नाईक बाजू मांडणार आहेत.
15 Oct 2026, 5:41 PM
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, हायकोर्टाचे आदेश
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी असल्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. फटाक्यांची निर्मिती आणि विक्रीवर कोणतीही बंदी नाही. डीजे, डॉल्बी, लाऊडस्पीकर आणि लेझर लाईट्सच्या वापरावरही निर्बंध. आठवडाभरात नियमावली तयार करून कठोर अंमलबजावणीचे आदेश देण्याची हाय कोर्टाचे आदेश आहेत. हरित फटाक्यांसह दिवाळी साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची सूचना देण्यात आली आहे. जनजागृतीसाठी सेलिब्रिटींची मदत घेण्याचे प्रशासनाला आदेश. हे निर्देश केवळ यंदाच्या दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता भविष्यातही कायम लागू ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची.
15 Oct 2026, 5:32 PM
धनगर आरक्षणासाठी धुळ्यात भव्य मोर्चा; सरकारला आंदोलनाचा इशारा
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज धुळे शहरात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलने आणि उपोषणे करूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने समाजबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धनगर समाजाचे नेते दिपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून क्युमाईन क्लबपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. महिला आणि तरुणींची लक्षणीय उपस्थिती हे मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले.
15 Oct 2026, 4:29 PM
सुट्टे पैशांवरून केडीएमटी बस कंडक्टर आणि ड्रायव्हरची प्रवाशाला जबर मारहाण
सुट्टे पैशांवरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना समोर आली आहे. केडीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या 46 वर्षीय प्रवासी नीरज कुमार कलानाथ झा यांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरवर आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. डोंबिवली स्टार कॉलनी चौकाजवळ सुरू झालेला हा वाद कासा रिओ गेटपर्यंत पोहोचला. केडीएमटी च्या दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण करून बसमधून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. स्थानिकांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. मारहाणीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
15 Oct 2026, 4:25 PM
ज्ञानेश कुमार भारतीय जनता पक्षाचा हस्तक; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
ज्ञानेश कुमार भारतीय जनता पक्षाचा हस्तक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. मत चोरीचे पुरावे मिळत आहेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
15 Oct 2026, 4:21 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना देणार संविधानाचे धडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाचे उद्या उद्घाटन होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार. या कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचुन दाखवणार. दादर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची जाणीव रुजविण्याचा उद्देश आहे. ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचेही प्रकाशन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर tv9 मराठी, साम टीव्ही, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी, नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.