SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पूर्व विदर्भाच्या विकासासाठी 42 हजार कोटींची मंजुरी! नागपूर ते गोंदियासह कोणत्या शहराला होणार फायदा?

नागपूरभोवती आता आणखी तीन मोठ्या वेगवान महामार्गांचे जाळे विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आनंदी बातमी आहे. या मार्गांमुळे पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 30, 2026, 01:57 PM IST | Updated: Oct 19, 2026, 12:10 PM IST
Image Credit: पूर्व विदर्भाच्या विकासासाठी ४२ हजार कोटींची मंजुरी
Join

विदर्भाकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल 42 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आता नागपूरला आणखी चार मोठ्या वेगवान हायवेने जोडण्यात येणार आहे. हे महामार्ग आहेत, नागपूर - गोंदिया, नागपूर - चंद्रपूर, भंडारा - गडचिरोली आणि नवेगाव मोरे-सूरजागड. या चार महामार्गामुळे शहरांच्या विकासासोबत दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे. या चारही प्रकल्पासाठी राज्य सरकारने 42 हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. या महामार्गाचा सर्वाधिक फायदा कृषी, खनिज आणि औद्योगिक वाहतुकीला मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

महामार्गांची लांबी किती?

या चारही महामार्गाबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आधी या महामार्गाची लांबी जाणून घेऊयात 

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग - 162.577 किलोमीटर

नागपूर-चंद्रपूर महामार्ग -  204.799 किलोमीटर 

भंडारा-गडचिरोली महामार्ग -  94.241 किमी 

या सर्व महामार्गाची एकूण लांबी ही 460 किलोमीटरहून अधिक लांबी असणार आहे. 

या महामार्गासाठी किती खर्च अपेक्षित ?

या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्चही सांगण्यात आला आहे. नागपूर-गोंदिया प्रकल्पासाठी प्रत्यक्ष बांधकाम खर्च 8,033.37 कोटी अपेक्षित आहे. तर जीएसटीसह प्रकल्प खर्च 12,878.24 कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. या मार्गासाठी 20 वर्षांच्या मुदतीचे 10,140 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासोबतच भागभांडवलाच्या स्वरूपात 4,552.01 कोटींसाठीही मान्यता मिळाली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव-कोनसरी-मूलचेरा-हेदरी ते सूरजागड या मार्गासाठी 3,954.99 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. 

आता नागपूर - चंद्रपूर महामार्गाचा प्रत्यक्ष बांधकाम खर्च 8,223.59 कोटी अपेक्षित आहे असं प्रकल्पाच्या करारात नमूद करण्यात आलंय. शिवाय जर विविध अनुषंगिक खर्च आणि जीएसटी धरून या प्रकल्पाचा खर्च 16,354.55 कोटींचा घरात अपेक्षित आहे, ज्याला शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 20 वर्षांच्या मुदतीचे 12,880 कोटी रुपयांचे कर्जासोबत 4.725.26 कोटींच्या भागभांडवलास शासनाने मंजुरी दिली आहे. तसंच भंडारा-गडचिरोली महामार्गाचा प्रत्यक्ष बांधकामासाठी 5,995 कोटींचा खर्च करारात मांडण्यात आला आहे. तर राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी 9,610.63 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता प्रकल्पांचा कामांना वेग मिळणार असून भविष्यात या महामार्गांमुळे नागपूरला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. शिवाय नागपूरच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES