लातूरमध्ये पोलिसांनी देहव्यापारी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यात एका 21 वर्षीय तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. तर दोन जणांना अटक केली आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल तपास करण्यात येते आहे. पोलिसांनी मिळालेल्या टीपनंतर त्यांनी या फ्लॅटवर धाड मारली होती.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मौली नगरमधील एका फ्लॅटमध्ये गैरकृत्य सुरू असल्याची टीप मिळाली. त्यानंतर या माहितीनुसार पोलिसांनी गुप्त धाड मारण्याचा प्लॅनिंग केलं. पोलिसांच्या रणनितीनुसार या फ्लॅटवर एका पोलिसांना साध्या ड्रेसमध्ये बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. त्या फ्लॅटवर गेल्यावर तिथे देहव्यापार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीदरम्यान पोलिसांनी 21 वर्षीय तरुणीची सुटका केली. तर दोघांना अटक केली असून त्यांची नावं जावेद युसूफ सैयद आणि जयश्री राम तरोटे असं आहे. तर पोलिसांनी सांगितलं की, एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. पोलीस आता तिसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत.
दरम्यान तरुणीची चौकशी करण्यात आली त्यात तिने पोलिसांना सांगितलं की, तिला देहविक्रीच्या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आले होते. तर ही तरुणी नागपूरची असल्याचे तिने पोलिसांनी सांगितलं. तिने अशीही माहिती दिली की, ग्राहकांकडून मिळणारे पैसे दोन्ही आरोपी आणि इतर संशयितांमध्ये वाटले जायचे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.