SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पोलीस ठाण्याच्या दारातच शिवसनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या; 7 जण जखमी; बुलढाण्यात थरार

बुलढाण्यात पोलीस ठाण्याच्या दारातच तलवारींचा थरार पहायला मिळाला. दोन गटात राडा झाला. तलावारीने हल्ला करण्यात आला. यात शिवसनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. 7 जण जखमी झाले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 06, 2026, 06:41 PM IST | Updated: Oct 09, 2026, 03:19 PM IST
Join

बुलढाणा क्राईम :  बुलढाण्यात कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्याच्या दारातच तलवारी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला. यात शिवसनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. तर, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. पण, या घटनेची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांनी संरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घ्यावी, त्याच पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रक्तपात झाला. देऊळगाव राजा शहरात कव्वालीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. लहान मुलांमधील किरकोळ वाद  मोठ्यांपर्यंत पोहोचला. दुसऱ्याच दिवशी त्याच वादाने रक्तरंजित वळण घेतले. 

वादाच्या संदर्भात दोन्ही गट देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले हे दोन्ही गट ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच आमनेसामने आले.  वाद वाढला आणि वातावरण तापलं. त्यानंतर थेट तलवारी आणि धारदार शस्त्रं बाहेर काढण्यात आली. 

वादाचं रुपांतर हाणामारीत झाले.  मग पोलीस ठाण्याच्या दारातच एकमेकांवर शस्त्रांनी हल्ले सुरू झाले. या हल्ल्यात शिंदेसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

पण या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच जर तलवारी उपसल्या जात असतील. पोलिसांच्या ठाण्याच्या दारातच जर दोन जणांचा जीव जात असेल तर कायदा-सुव्यवस्थेची भीती नेमकी कुठे राहिली? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्याच्या अगदी प्रवेशद्वारावरच हा रक्तपात होणं, ही निश्चितच गंभीर बाब आहे. 

या दुहेरी हत्याकांडानंतर देऊळगाव राजा शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेला राजकीय रंग देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे स्थानिक आमदार मनोज कायंदे यांनी घेतली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES