SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

माणुसकीला काळिमा फासणारी घटना! अंधश्रद्धेमुळे स्वत:च्याच मृत बाळाला हात लावण्यास आई-वडिलांचा नकार; म्हणाले, 'आमच्यात नवरात्रीमध्ये...'

आपल्याच पोटी जन्म घेतलेल्या बाळाला अखेरचा निरोप देताना आई-वडील एवढे निष्ठूर का झाले? त्यांनी या बाळाला हात लावण्यासही नकार का दिला? नक्की छत्रपती संभाजीनगरच्या स्मशानभूमीमध्ये काय झालं? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 14, 2026, 11:19 AM IST | Updated: Oct 14, 2026, 11:30 AM IST
Image Credit: हा सारा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला (प्रातिनिधिक फोटो)
Join

मानवतेला काळिमा फासणारा  संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. नऊ महिने ज्या गर्भाला पोटात वाढवलं, त्याच अवघ्या एका दिवसाच्या मृत बाळाला शेवटचा हात लावण्यासही  आई-वडिलांनी  नकार दिला. ज्या हातांनी त्या फुलासारख्या जिवाला कवटाळायला हवं होतं, तेच हात अंधश्रद्धेच्या बुरख्याआड मागे खेचले गेले. नेमकं घडलं काय आणि या बाळावर अंत्यसंस्कार कोणी केले, नक्की या बाळाच्या नातेवाईकांचं म्हणणं काय होतं जाणून घेऊयात...

का हात लावला नाही?

रक्ताचे नातेवाईकच दगडासारखे पाषाणहृदयी बनल्याचे विदारक वास्तव या घटनेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले आहे.  "सध्या नवरात्र सुरू आहे, आमच्यात बाळ बाळंतिणीला हात लावत नाहीत, आम्ही कोणताही विधी करणार नाही," असा असा  पवित्रा बाळाच्या वडीलाने घेतला. धर्माच्या आणि रूढी-परंपरेच्या नावाखाली स्वतःच्याच मृत बाळाला विद्रूपपणे नाकारणाऱ्या या आई-वडिलांच्या वृत्तीने उपस्थित डॉक्टरांचेही डोके सुन्न झाले. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी हा अंत्यविधी केला.

अंत्यविधी कोणी केले?

या बाळावर स्मशानभूमीमधील कर्मचारी सुनिता गायकवाड आणि त्यांच्या मुलाने अंत्यसंस्कार केले. सुनिता यांनी या बाळाचा एकही नातेवाईक आला नव्हता असं सांगितलं. तसेच माझ्या मुलानेच रुग्णालयामधून फोन आल्यानंतर तिथे जाऊन या बाळाचं पार्थिव ताब्यात घेतलं आणि ते स्मशानभूमीत आणल्याचं सुनिता प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाल्या. 

अत्यंविधीसंदर्भात स्मशानभूमीतील महिला काय म्हणाली?

सुनिता गायकवाड यांनी, "एक दिवसाचं बाळ होतं. आई, वडील कोणीच त्या बाळाला हात लावत नव्हतं. आम्ही स्वत: त्या बाळाचे अत्यंविधी केले. त्या बाळाचे आई-वडील कोणीच नव्हतं आलं. त्यांना तर दु:खही वाटलं नाही की आपलं बाळ वारलं. आम्ही नवरात्रामध्ये असूनही अत्यंविधी करतो," असं सांगितलं. "करोना काळातही आम्ही अनेक अंत्यविधी केले. पण कालचा प्रकार पाहून अजून माणसाचा अंधश्रद्धेवरील विश्वास गेला नाही, असं वाटलं. नवरात्र आहे म्हणून त्या बाळाच्या घरच्यांनी कोणीच हात लावला नाही. माझ्या मुलाने रुग्णालयात त्या बाळाचं पार्थिव आणून आम्ही इथे अंत्यसंस्कार केले," असं सुनिता यांनी सांगितलं.

"बाळाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, आम्ही बाळाला हात नाही लावू शकत. तुम्ही बाळ आणा आणि त्याचे अत्यंविधी करा. आम्हाला पण दु:ख वाटतं पण आम्ही करतो अंत्यसंस्कार," असं सुनिता यांनी म्हटलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES