SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भर दुष्काळात भाजपच्या माजी आमदारावर नोटांची उधळण

जालन्यात भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण झाली. नवरात्र उत्सवानिमित्त काल रात्री जालना शहरात झालेल्या भजन कार्यक्रमांमध्ये त्यांच्यावर नोटांची उधळण झाली.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 14, 2026, 07:15 PM IST | Updated: Oct 14, 2026, 07:22 PM IST
Join

कैलास गोरंट्याल: जालन्यात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली. 14 ऑक्टोंबर रोजी रात्री जालना शहरात मंमादेवी मंदिर परिसरात पार पडलेल्या भजन कार्यक्रमांमध्ये ही नोटांची उधळण करण्यात आली. भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रात्री शहरातील मंमादेवीच्या भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ठेका धरला.  भर दुष्काळात गोरंटयाल यांच्यावर त्यांच्याच समर्थक नगरसेवकाने पैशाचा पाऊस पाडला. 
 

जालन्यातील भाजपचे नेते आणि माजी आमदार असलेल्या कैलास गोरंट्याल यांचा  डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरीकांसाठी नवीन नाही. गोरंट्याल कुणाच्या लग्नात, गणपती उत्सवात आणि नवरात्र उत्सवात डान्स करतानाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यंदाही गोरंटयाल यांचे असेच डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले.

दरम्यान काल जालना शहरातील मम्मादेवी परीसरात एका भजन कार्यक्रमात गोरंटयाल यांनी डान्स केला. या डान्सवेळी गोरंट्याल समर्थक असलेल्या नगरसेवक महावीर ढक्का यांनी भर दुष्काळात गोरंटयाल यांच्यावर पैशाचा पाऊस पाडला. ढक्का  यांनी 500 रुपयांच्या नोटांची गोरंट्याल यांच्यावर उधळण केली.ढक्का यांच्या या कृत्यामुळे शहरात त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आणि राज्यात एका बाजूला महाभयंकर दुष्काळ असताना भाजप नगरसेवक असलेल्या महावीर ढक्का यांनी गोरंट्याल यांच्यावर पैशांची उधळण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

मात्र, या प्रकरणावर ढक्का यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी गोरंट्याल यांनी मात्र प्रतिक्रिया दिली. देवाकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली, भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो, तेव्हा कोण काय करतो माहित पडत नाही असे स्पष्टीकरण भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी देत या प्रकरणावर सारवा सारव केली आहे. 

दरम्यान ही प्रतिक्रिया दिल्यानंतर गोरंटयाल यांनी आणखी एक प्रतिक्रिया या प्रकरणावर दिली. मी नाचत असताना उडवलेले पैसे केवळ 5 ते 10 हजार रुपये होते. हे शगुणचे पैसे असल्याचं गोरंटयाल यांनी म्हटलं.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES