SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावरच मोठा वाद! भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळ आमनेसामने

पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याच्या मुद्यावरून भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळ आमनेसामने आले असून, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 01, 2026, 08:35 PM IST | Updated: Oct 09, 2026, 03:17 PM IST
Join

ज्ञानेश्वर पतंगे, धाराशिव

धाराशिवच्या प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावरच मोठा वाद पेटला आहे. पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याच्या मुद्यावरून भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळ आमनेसामने आले असून, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बायोमेट्रिक कार्डमुळे बोगस पुजारी तयार होत असल्याचा दावा भोपे पुजाऱ्यांनी केलाय, तर भोपे पुजारीच मंदिरात दलाली करत असल्याचा पलटवार पाळीकर पुजाऱ्यांनी केलाय. नवरात्र जवळ आले असताना हा वाद चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे.

जगदंबा माता तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. देशभरातून लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी धाराशिवमध्ये दाखल होणार आहेत. मात्र, या पवित्रोत्सवाच्या तोंडावरच मंदिरातील पुजाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुजाऱ्यांच्या अधिकृत ओळखपत्र (बायोमेट्रिक कार्ड) देण्याच्या प्रक्रियेवरून दोन मोठे गट — भोपे पुजारी मंडळ आणि पाळीकर पुजारी मंडळात जोरदार जुंपली आहे.

बायोमेट्रिक ओळखपत्राच्या माध्यमातून मंदिरात बोगस पुजारी घुसडवण्याचा आणि बोगस चेहरे तयार करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप भोपे पुजारी मंडळाने केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मूळ परंपरेला धक्का लागत असल्याचा दावा भोपे पुजाऱ्यांनी केलाय.

पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सांगितलं आहे की, "बायोमेट्रिक ओळखपत्राच्या नावाखाली याठिकाणी बोगस पुजारी तयार केले जात आहेत. मंदिराच्या परंपरेशी तडजोड करून हे सुरू आहे, जे आम्ही खपवून घेणार नाही," असे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी सांगितले आहे.

भोपे पुजारी मंडळाच्या या आक्रमक भूमिकेनंतर पाळीकर पुजारी मंडळानेही तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले आहे. भोपे पुजारी स्वतःला प्रशासनापेक्षा मोठे समजतात आणि मंदिराच्या कारभारात विनाकारण लुडबुड करून दलाली करत असल्याचा पलटवार पाळीकर पुजाऱ्यांनी केलाय.
"भोपे पुजारींचं काम नियम पाळण्याचं आहे, पण ते उलट मंदिरात दलाली करत आहेत. प्रशासनाच्या प्रत्येक कामात लुडबुड करणे हा त्यांचा उद्योग झाला आहे," पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी म्हटले आहे.

एकीकडे बोगस पुजारी तयार केल्याचा संशय, तर दुसरीकडे मंदिरात दलाली चालल्याचे गंभीर आरोप; या सगळ्या प्रकारामुळे बायोमेट्रिक ओळखपत्राचा हा मुद्दा आता पुजारी मंडळांमधील राजकीय आणि सामाजिक वर्चस्वाची लढाई बनत चालला आहे. नवरात्रोत्सवाच्या ऐन तोंडावर हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भाविकांची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे पुजारी मात्र आपापसात भिडले आहेत. विशेष म्हणजे, एवढा मोठा वाद पेटलेला असतानाही मंदिर संस्थानच्या प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES