SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

2029 च्या निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावरुन मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'जर...'

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावरुन भाषण करताना पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा उल्लेख केला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 02:12 PM IST | Updated: Oct 20, 2026, 02:22 PM IST
Image Credit: ...तर मराठा समाज उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, मनोज जरागेंचं दसरा मेळाव्यातून आवाहन
Join

जो आपल्या विरोधात उठेल त्याचा बाजार उठवायचा. जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल तो 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही. जो आपल्यासाठी नाही तो आपला नाही असा जाहीर इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावरुन भाषण करताना पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा उल्लेख केला. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना भिकेला लावायचं असंही आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठीही लढा उभारण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना 1 लाख हेक्टरी मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी मराठ्यांसाठी तीन मोबाईल क्रमांक दिले असून, त्यावर आपल्या तक्रारी, समस्या मांडण्यास सांगितलं.


"ही अस्सल मराठ्यांची पैदास आहे. लोकांना काय वाटतंय यापेक्षा आपण काय करतोय याला किंमत आहे. कधीतरी आपल्या समाजाचं दु:ख ऐकायला शिका. तुमच्या आणि आमच्या लेकरा बाळांना त्रास होत आहे, त्यामुळे दूर जाऊ नका. ऊन, वारा अंगावर कशासाठी घेत आहोत हे समजून घ्या. लोक कशासाठी झुंजत आहेत आणि आपण कशासाठी हे जाणून घ्या. तीन वर्ष झाली मराठा समाज संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील समाज ऊन्हा तान्हात झटत आहे. भान ठेवा, कोण काय बोलतंय, काय शब्दप्रयोग केला जात आहे. समाजाला हिणवलं जात आहे," अशी टीका मनोड जरांगे यांनी केली आहे.

"लोक पक्ष आणि नेता मोठा करत आहेत. पण आपण या समाजाची प्रत वाढवत आहोत. संकट आल्यानंतर कोणत्याही पक्षातील मराठा नेता असू द्या, त्याच्यावर जर संकट आलं तर मराठा समाज माय बाप बनून पांघरुन टाकतो. समाजाने सोडलं तर जेल भोगावं लागतं. समाज मोठा झाला पाहिजे. लेकरं मोठी झाली पाहिजे. समाज उद्धवस्त झाला तर मराठा समाज उद्धवस्त होण्यास वेळ लागणार नाही," असं आवाहन त्यांनी केलं.

"मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजासाठी मोबाईल नंबर दिले आहेत. 22 तारखेला मोबाईल नंबर दिला जाईल. त्या नंबरवर मराठा सेवक म्हणून नाव गाव पत्ता पाठवायचा. ज्यांच्या कुणबी नोदी सापडल्या पण प्रमाणपत्र देत नाही, दाखल करुन घेत नाही किंवा इतर समस्या आहेत त्यांनी आरक्षणासंदर्भात माहिती टाकायची आहे. त्यासाठी वेगळा नंबर असेल. मराठा समाजाच्या अडचणींसाठी आणखी एक नंबर देत आहेत. कोणी फोन करायचा नाही. आम्हाला राज्यातील मराठा समाजाच्या अडचणी कळल्या पाहिजेत यासाठी नंबर आहे," असं त्यांनी सांगितलं.

समाजातील 80 टक्के लोकांचं हातावर पोट आहे. नेते, पक्षप्रेम आता बास करा. शेतात राबल्याशिवाय सुखाचा घास मिळत नाही,. ज्यांना मोठं केलं त्यातील एकही येत नाही. 80 टक्के मराठा असे आहेत, जे शेतीत पिकलं नाही तर खाऊ शकत नाही. समाज कोणत्याही स्थितीत मोठा करायचा आहे. त्यांना पाटोद्यात शब्द दिला असून, तीन महिन्यातील एक महिना गेला असून, दोनच राहिले आहेत. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमची ताकद वाढवणार. आम्ही मराठा कोणाच्यात जीवावर नसून, आमच्याच जीवावर आहोत. मी इमानदारीने काम करत आहोत. लाखो मुलं आरक्षणात गेल्याने त्यांचं पोट दुखत आहे अशी टीका त्यांनी केली.

तुमच्या हातात सत्ता होती, मराठा समाज तुमचं ऐकत होता तेव्हा वाटोळं केलं. तुम्ही तुमची घरं भरली, बंगले बांधले अशी टीकाही केली. मी काय चूक करत आहे? समाजाची मान खाली जाईल असं एकही पाऊल उचललेलं नाही. जो आपल्या विरोधात उठेल त्याचा बाजार उठवायचा. जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल तो 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही असं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याची घोषणा केली. 'आता शेतकऱ्यांची लढाईही सर्वांनी मिळून लढायची आहे. शेतकऱ्याला 1 लाख हेक्टरी मदत मिळवून द्यायची आहे. त्यासाठी मोठा लढा उभारु. संपूर्ण कर्जमुक्ती मिळायला हवी. पीक विम्याचे सगळे पैसे खात्यावर जमा झाले पाहिजेत. रखडलेले सर्व अनुदान घ्यायचं असं ते म्हणाले. चारा छावण्या गावागावात उभ्या करा. टँकरने गावाला पाणी द्यायचं असंही ते म्हणाले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES