SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

स्वतःच्या मौजमजेसाठी 1 महिन्याच्या बाळाची विक्री; जन्मदात्यांनीच पैशासाठी केला चिमुकल्याचा सौदा, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका निर्दयी दांपत्याने स्वतःच्या अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याला तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 04:01 PM IST | Updated: Oct 09, 2026, 03:13 PM IST
Join

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातून आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका निर्दयी दांपत्याने स्वतःच्या अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याला तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी  पोलिसांनी वेगाने पावले उचलत एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात 12 वी नापास असलेल्या एका बोगस डॉक्टरसह एकूण ७ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना, जाणून घ्या.


रक्ताचा सौदा करणारे गजाआड

स्वतःच्या मौजमजेसाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्मादात्यांनीच पोटच्या गोळ्याचा सौदा केल्याची क्रूर घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. नात्याची सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या या दांपत्याने अवघ्या 30 दिवसांच्या बाळाची विक्री केली. संतापाची बाब म्हणजे बाळाला विकून मिळालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांमधून या निर्दयी आई-वडिलांनी 25 हजारांचा नवीन स्मार्टफोन आणि 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले.. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपींकडून खरेदी केलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त केला आहे. गरिबीचे कारण पुढे करत स्वतःच्याच रक्ताचा असा सौदा करणाऱ्या या दांपत्याच्या कृत्याने संपूर्ण संभाजीनगर सुन्न झाले आहे


या निष्पाप प्राणाचा हा व्यापार इथेच थांबला नाही. मध्यस्थांच्या जाळ्यात अडकून या अवघ्या एका महिन्याच्या बाळाची तब्बल 3वेळा खरेदी-विक्री करण्यात आली

पहिली विक्री: मुख्य मध्यस्थ सीमा रेशवाल हिने बाळाचा ताबा घेऊन पडगाव येथील संगीता आव्हाड हिला 2 लाख 70 हजार रुपयांत बाळ विकले

दुसरी विक्री: संगीताने थेट नांदेड गाठून तेलंगणातील पिंपेरला येथील सुरेश गुंटुका या 12 वी फेल बोगस डॉक्टरला 3 लाख 50 हजारांत बाळाचा ताबा दिला

तिसरी विक्री: या बोगस डॉक्टरने हैदराबाद येथील उमा खटकम या नातेवाईक महिलेला हे बाळ साडेतीन लाखांत सोपवले. अशा प्रकारे पैशांच्या लालसेने एका निष्पाप जिवाची वेगवेगळ्या राज्यांत टप्प्याटप्प्याने दलाली करण्यात आली.


स्वतःच्या सुखासाठी आणि मौजमजेसाठी स्वतःच्याच पोटच्या गोळ्याचा सौदा करणाऱ्या अशा जन्मादात्यांना आई-बाप तरी कसे म्हणायचे, पैशांच्या मोहापायी एका निष्पाप जिवाचा लिलाव मांडणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा होणार का, स्वतःच्या अंगावर खेळणाऱ्या बाळाला विकून ज्या आईला दागिन्यांची आणि मोबाईलची हौस फेडावीशी वाटते, अशा क्रूर मनाच्या आईवर संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES