SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Breaking Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन संशयित सुरतमधील सीसीटीव्हीत कैद

Breaking News Today LIVE Updates 19 october 2026 : राज्यातील त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 19, 2026, 02:45 PM IST | Updated: Oct 19, 2026, 09:09 PM IST
Join

Breaking News Today LIVE Updates 19 october 2026 : राज्यामधील मागील काही तासांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, यासंदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करत रहा. अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अद्याप या संशयिताची ओळख उघड करण्यात आलेली नाही. गुन्हे शाखेचे पथक सध्या त्याची चौकशी करत आहे. मालेगाव शहरातील भरवस्तीत राष्ट्रीय एकात्मता चौक येथे आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान हिंदुस्थान पेट्रोलियम च्या टँकर ने एका दुचाकी स भीषण धडक दिली या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक बालक आणि एक इसम गंभीर जखमी झाले आहे.

19 Oct 2026, 9:09 PM

फेर मतदान होणार का ?

सर्वसाधारण गटात २१ नंबर ला असणाऱ्या महायुतीचे उमेदवार युवराज पाटील यांनी दिला फेर मतमोजणींचा अर्ज.
फेर मतदान होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
आबाजी पाटील आणि युवराज पाटील या दोघांनी फेर मतमोजणी साठी केला अर्ज.

19 Oct 2026, 9:08 PM

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
अंधेरीतील एक कार्यक्रमात जॅकी श्रॉफ आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा
टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

19 Oct 2026, 9:07 PM

गोकुळ दूध संघ निवडणूक अपडेट मतमोजणी केंद्रावर राजू शेट्टी दाखल

गोकुळ दूध संघ निवडणूक अपडेट मतमोजणी केंद्रावर राजू शेट्टी दाखल

19 Oct 2026, 8:28 PM

CSMT वरून सुटणाऱ्या सर्व लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत

CSMT वरून सुटणाऱ्या सर्व लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, काही अपरिहार्य कारणांमुळे सीएसएमटी स्थानका वरून जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन ५-१० मिनट उशिराने धावत असल्याची CSMT स्थानकावरून घोषणा. CSMT रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली, लोकल ट्रेन उशिराने का धावत आहेत याचं कारण अद्याप अस्पष्ट. 

19 Oct 2026, 7:23 PM

CJP चे आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत 2 दिवसांची वाढ

CJP चे आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत 2 दिवसांची वाढ
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी कोठडीची मुदत वाढवण्याचा घेतला निर्णय
जामीनासाठीच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याने न्यायालयीन कोठडीत वाढ
5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना SEM कोर्टात हजर करण्यात आले होते

19 Oct 2026, 6:16 PM

विजयादशमीला श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर १८ वा दसरा मेळावा

आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे सालाबादप्रमाणे उद्या, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मेळाव्याचे अठरावे वर्ष असून, आमदार सुरेश धस यांच्यासह विविध संत-महंतांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या मेळाव्यास नाथभक्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे

19 Oct 2026, 5:49 PM

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र
खर्गेंच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मागणीवर दिलं प्रत्युत्तर
खर्गेंनी १६ ऑक्टोबरला पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचा रिजिजूंचा उल्लेख
सर्वपक्षीय बैठकीची मागणी करण्यापूर्वी विरोधकांनी सहकार्य करावं, असं रिजिजूंचं आवाहन
काँग्रेसला चर्चेसाठी अनेकदा पत्र लिहिल्याचा केंद्र सरकारचा दावा
राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचं रिजिजूंचं पत्रात नमूद
शिवसेना उबाठा, द्रमुक, समाजवादी पक्ष, वायएसआर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, यांसह विविध पक्षांशी चर्चा केल्याचा दावा
संसदेत महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने अडथळा आणू नये, असं रिजिजूंचं आवाहन

19 Oct 2026, 5:44 PM

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान… कुठे पिकं उद्ध्वस्त झाली, तर कुठे पीकविम्याचे दावे प्रलंबित! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर साळवे यांनी अनोखं आंदोलन केलं. चक्क घोड्यावर स्वार होत आणि गळ्यात भोपळ्याची माळ घालून त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसंच नुकसानीचं प्रत्यक्ष शेतात जाऊन नव्याने सर्वेक्षण करावं, अशी मागणी त्यांनी केली. या अनोख्या आंदोलनातून डॉ. साळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत डॉक्टर साळवे यांनी व्यक्त केले आहे.

19 Oct 2026, 3:47 PM

धक्कादायक अमरावतीत नवजात बाळाची विक्री

अमरावती शहरात नवजात बाळाच्या विक्रीच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री केल्याचा गंभीर आरोप एका महिला डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारासंदर्भात एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख वर्षा भोयर आणि युवती सेना प्रमुख कोमल बद्रे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. दरम्यान या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर, तिचा पती आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला डॉक्टर आणि तिचा पती फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बाळाच्या विक्रीबाबतचे आरोप आणि आर्थिक व्यवहाराची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे

19 Oct 2026, 3:46 PM

मनोज जरांगे पाटलांचा उद्या नारायण गडावर दसरा मेळावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या शांत आहेत.जरांगे यांनी अंतरवाली सराटीत 11 वं आमरण उपोषण करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी मुंबई च्या दिशेने कूच केली होती.आणि बिड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांनी 17 सप्टेंबर रोजी मुंबई आंदोलन स्थगित केलं.त्यानंतर जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार करण्यात आले.रुग्णालयातून काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हापासून जरांगे शांत आहेत. पण जरांगे जरी शांत दिसत असले तरी त्यांचेच एकेकाळची सहकारी जरांगे यांच्या विरोधात पेटून उठलेत. तरीही जरांगे पाटलांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही.मात्र असं असलं तरी आता उद्या बिड जिल्ह्यातील नारायणगडावर मनोज जरांगे त्यांच्या भाषणात काय बोलणार याची मराठा आंदोलकांना उत्सूकता लागलीय.नारायण गड उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज झालाय

19 Oct 2026, 3:29 PM

फडणवीसांच्या आरोपांना वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर

उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब ठेवल्याच्या जुन्या घटनेचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत, जुन्या प्रकरणांची चर्चा करण्यापेक्षा राज्यातील सध्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत अशा प्रकारच्या पाच घटना घडल्याचा दावा करत, केवळ गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडून चालणार नाही, तर या घटनांच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री सक्षम असले, तरी त्यांचं लक्ष निवडणुका जिंकण्यावर असल्याची टीकाही त्यांनी केली

19 Oct 2026, 3:16 PM

भंडारा नगरपरिषदेवर सफाई कामगारांचे भीक मागो आंदोलन!

भंडारा नगरपरिषदेतील सफाई कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, ५९ सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आज सफाई कामगारांनी थेट भंडारा नगरपरिषदेवर धडक देत भीक मागो आंदोलन केले. दैनंदिन रोजंदारीत वाढ करावी आणि कामावरून कमी केलेल्या ५९ सफाई कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आता नगरपरिषद प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कामगारांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

19 Oct 2026, 3:16 PM

मोरीवली एमआयडीसीतल्या प्रदूषणकारी कंपन्यांवर अखेर कारवाई!

मोरीवली एमआयडीसी भागातील अनेक रासायनिक कंपन्या खर्च वाचवण्यासाठी स्क्रबिंगची प्रक्रिया करत नाहीत. त्यामुळे ऍसिडीक गॅस थेट हवेत पसरतो. याचा त्रास मागील काही दिवसांपासून बी केबिन रोड परिसरातील नागरिकांना होत होता. याबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही एमपीसीबी अधिकाऱ्यांसोबत प्रदूषणकारी कंपन्यांची पाहणी करत अधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली होती. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या एमपीसीबीनं मोरीवली एमआयडीसीत धाडी टाकत कंपन्यांची पाहणी केली. यात सुमा केमिकल्स आणि अविदित्य केमिकल्स या दोन कंपन्यांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. तसंच स्क्रबिंगची प्रक्रियाही नीट केली जात नसल्याचं आढळलं. त्यामुळे या दोन कंपन्यांना एमपीसीबीनं क्लोजर नोटीस बजावली आहे.

19 Oct 2026, 2:59 PM

आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी...
एक व्यक्ती माझ्या घराबाहेर उभा असल्याचे बोलून मला फोन द्वारे अर्वाच्या भाषेत बोलत असल्याचे आव्हाडांनी Ex ट्विट करत दिली माहिती...
यापूर्वीही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ बॉम्ब असल्याचे त्यांना e मेल द्वारे सांगून देण्यात आली होती धमकी..

19 Oct 2026, 2:56 PM

कायदा आणि सुव्यवस्थेवरून संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी सोमवारी, राज्यात वाढत्या गोळीबार, हत्या, खंडणी आणि अपहरणाच्या घटनांवरून गृहखाते सांभाळणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षांची 'सत्तापालटाची' घोषणा दिली. अभिनेता टायगर श्रॉफवर दोघांनी गोळीबार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ही टिप्पणी केली. या गोळीबारात टायगर श्रॉफ बचावला, तर इतर दोघे जखमी झाले.

19 Oct 2026, 2:49 PM

राखीव गटातील 5 पैकी 4 जागांवर समविचारी आघाडी आघाडीवर

ओबीसी गटातून हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर तर समविचारी आघाडीचे शशिकांत खोत आघाडीवर
महिला गटातून शौमिका महाडिक आणि अंजना रेडकर आघाडीवर तर भाग्यश्री डोंगळे आणि अर्चना पाटील पिछाडीवर
अनुसूचित जाती गटातून समविचारी आघाडीचे राजू बाबा आवळे अघाडीवर तर महायुतीचे सुजित मिनचेकर पिछाडीवर

19 Oct 2026, 2:48 PM

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात संशयिताला ताब्यात

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अद्याप या संशयिताची ओळख उघड करण्यात आलेली नाही. गुन्हे शाखेचे पथक सध्या त्याची चौकशी करत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES