SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra News LIVE Today: CJPच्या अभिजीत दिपकेंना कोर्टात हजर करणार

राज्यात तसेच देशभरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स तुम्ही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून बघू शकता. एक क्लिकवर सगळे पपेट्स बघा.

Reported By tejashree gaikwad
Published: Oct 17, 2026, 10:17 AM IST | Updated: Oct 17, 2026, 12:44 PM IST
Join

दिल्लीतील कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क आज बंद असून सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा घेऊन आंदोलन करण्याचे CJP चे आवाहन,आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार्क आज बंद,नवी दिल्ली महानगरपालिकेचा निर्णय. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ दौरा, शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जाहीर सभा घेणार. एमपीएससी मधील तक्रारीची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत. सतीश वाघोलेंची MPSCच्या अतिरिक्त कार्यभार अध्यक्षपदी. वर्धा येथे दत्ता मेघे विद्यापीठ यांचा 17 वा दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार. या आणि अशा सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर... 

17 Oct 2026, 12:43 PM

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची आज पुन्हा चौकशी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
----
राजेंद्र शिंदे यांची आज पुन्हा चौकशी
----
मंगळवारी 9 तास तर बुधवारी 8 तास चौकशी
----
राजेंद्र शिंदेंवर एसआयटी पथकाला संशय?

17 Oct 2026, 12:12 PM

CJPच्या अभिजीत दिपकेंना कोर्टात हजर करणार


सौरभ दास, आशुतोष रांकाच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने पुकारलेल्या लहरा दो तिरंगा आंदोलनामुळे दिल्लीत वातावरण चांगलेच तापलं होतं...शुक्रवारी सकाळपासूनच दिल्लीत नाट्यमय घडामोडी घडत होता...सीजेपीच्या मोर्चाआधीच दिल्ली पोलिसांनी धरपकड सत्र सुरु केलं होतं...अभिजीत दिपके,नेहा बोरासह 150 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...पोलीस कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले...महत्त्वाच्या लोकांच्या धरपकडीनंतरही तरुणांनी कनॉट प्लेस परिसरात तिरंगा फडकावला....दरम्यान रात्री उशिरा पोलिसांनी नेहा बोराला सोडलं असून दिपकेला अटक करण्यात आलीय...दिपकेला 
BNSS कलम 126 आणि  170 अंतर्गत अटक केली असून थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल

17 Oct 2026, 11:49 AM

'शिवसेना एमआयएम सारखाच सेक्युलर पक्ष'- MIM नगरसेविका सहर शेख

 

युनूस शेख यांची केबल सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सहर शेख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. शिवसेना पक्ष एमआयएमसारखाच सेक्युलर आहे. आम्हाला कधीही असे वाटले नाही की शिवसेना हा केवळ हिंदुत्वाचा पक्ष आहे. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत.. अशी प्रतिक्रिया सहर शेख यांनी दिलीय
 

17 Oct 2026, 11:10 AM

महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी वादावर अखेर पडदा

मराठवाड्यात पदवीधर निवडणुकीवरनं महायुतीत सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी पदवीधरचे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली होती. अमरावती शिक्षक निवडणुकीतील उमेदवारापासन हा वाद सुरू झाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या शिष्टाईला यश आलेले आहे आणि अखेर संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झालेत.

17 Oct 2026, 10:43 AM

फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द

प्रदीप पूर्णेकरांच्या मुलानं मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, 'वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठिशी', फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द...

17 Oct 2026, 10:42 AM

MPSCच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे

MPSCच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे…पेपरफुटीच्या तपासासाठी माजी न्यायमूर्ती सतीश भोसलेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित…दोन महिन्यांत समितीचा अहवाल अपेक्षित…

17 Oct 2026, 10:37 AM

सीजेपी आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात- शिंदेंचा आरोप

इंडिया आघाडी आणि सीजेपीच्या आंदोलनावर फडणवीस, शिंदेंची टीका, हा भारत असून पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका देश नाही, फडणवीसांनी ठणकावलं.... तर सीजेपी आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात, शिंदेंचा आरोप

17 Oct 2026, 10:36 AM

शिवसेना एमआयएम सारखाच सेक्युलर पक्ष'


--'शिवसेना सर्वांना सोबत घेऊन चालते'
--MIM नगरसेविका सहर शेख यांची प्रतिक्रिया

17 Oct 2026, 10:35 AM

मुख्यमंत्री फडणवीस नागपूर, वर्धा दौऱ्यावर


--भाजपचा उच्च शिक्षितांसोबत संवाद मेळावा
--फडणवीस डॉक्टर, वकील, प्राध्यापकांशी संवाद साधणार

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.

ZEENEWS TRENDING STORIES