SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

देवेंद्रजी आपली युती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितला त्या व्यंग्यचित्राचा किस्सा

महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक जुने किस्से सांगितले.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 29, 2026, 09:48 PM IST | Updated: Oct 29, 2026, 10:18 PM IST
Join

Maharashtra Politics:   महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने  देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे  एकाच मंचावर उपस्थित राहिले. भाजपने नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक जुने किस्से सांगितले. यावेळी उद्ध ठाकरे यांनी जुन्या व्यंग्य चित्राचा किस्सा सांगितला. 

ब्रेकिंग news मध्ये दोन ओळीत असलेल्या स्पेसमधला मतितार्थी व्यंगचित्रकार काढतो. बाळासाहेब आजारी असताना म्हणाले, माझी व्यंगचित्रकार म्हणून ओळख नाही राहिली. तेव्हा पुस्तकाच ठरलं. तेव्हा बाळासाहेब हॉस्पिटमध्ये होते तेव्हा तिथे नाव ठरलं 'फटकारे. ' आमच्या घरात व्यंगचित्र नेहमी असायचे, त्यामुळे आम्हाला त्याचं तेव्हा महत्त्व नव्हतं अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  कार्टून काढले की ते ब्लॉकला दिले की पुन्हा आम्ही घेतले नाही . त्यामुळे खूप चित्र गेली, गहाळ झाली, पण आता त्याचं महत्व कळत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

व्यंगचित्र हे गुप्त धन आहे.  आज आपलं सगळ्यांच स्थान आहे. ते व्यंगचित्रामुळे आहे. हे महत्वाचे  चर्चिल 80 वर्षाचा झाला तेव्हा एक व्यंगचित्र कार्टून पुस्तक काढण्यात आलं. त्यात आशिया खंडातील केवळ बाळासाहेबांचे 3 चित्र छापले गेले.  राजाच पहिलं आणि माझं शेवटचं कार्टून एकत्र झालं. 

राजाच पहिलं आणि माझं शेवटचं कार्टून एकत्र झालं

राजाच पहिलं आणि माझं शेवटचं कार्टून एकत्र झालं. व्यंगचित्रकार हा उत्कृष चित्रकार असला पाहिजे अस बाळासाहेब म्हणायचे. ज्यांच्यासाठी व्यंगचित्र काढताय त्यांना ते कळलं पाहिजे. पूर्वी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा बंगल्यांच्या नावाने व्यंगचित्र काढायचे . आता तुमच्याकडे किती खाती आहेत मला माहित नाही.

फडणवीस, उद्धव, राज ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा 

फडणवीस, उद्धव, राज ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' पुस्तक प्रकाशनाआधी या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे पदवीधरवरून भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी. दुसरीकडे फडणवीसांच्या नेतृत्वाकडे शिंदेंच्या शिवसेनेचं बोट. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये बंददाराआड झालेल्या चर्चांमुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत

राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात

राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात. त्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बोलवत जावं, असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केले. तर फडणवीसांना 2029पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, असं म्हणत शेलारांच्या विधानावर राज ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला. मुंबईत महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडलाय. या कार्यक्रमात ही टोलेबाजी पहायला मिळाली.

उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES