• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या विहानच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? 2 महिन्यांनी चौकशी अहवाल सादर, म्हणाले 'असं एकच कारण...'

चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या विहानच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? 2 महिन्यांनी चौकशी अहवाल सादर, म्हणाले 'असं एकच कारण...'

चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये एकच कारण जबाबदार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 04, 2026, 09:24 AM IST|Updated: Nov 04, 2026, 09:28 AM IST
joinshare
चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या विहानच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? 2 महिन्यांनी चौकशी अहवाल सादर, म्हणाले 'असं एकच कारण...'
Image Credit: विहानच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल महापालिकेकडे सुपूर्द

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात आणखी एक वंदे-भारत स्लीपर धावणार? पुणे ते नागपूर...

महाराष्ट्रात आणखी एक वंदे-भारत स्लीपर धावणार? पुणे ते नागपूर...

2

'शिवाजी पार्कमधला दीपोत्सव होणार नाही', दुष्काळामुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय, 'फटाके फोडताना आवर घाला'

3

'.... तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

4

काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण

5

21 वर्षीय तरुणी, 3 पुरुष अन् एक फ्लॅट...लातूरच्या छाप्यामध्ये काळा कारभाराच्या उघड, पोलीसही चक्रावले

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी अखेर चौकशी अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये एकच कारण जबाबदार नसल्याचे सांगण्यात आले आहे. चेंबूरमध्ये 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. संजय देशमुख यांनी चौकशी अहवाल तयार केला. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर सोमवारी हा अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून, झाड कोसळण्यामागे एकच कारण किंवा केवळ नैसर्गिक आपत्ती जबाबदार नसल्याचे अहवालात नमूद आहे.

दुर्घटनेच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क करण्यात आली होती, अशी चौकशीत माहिती समोर आली आहे.  झाड कोसळण्याच्या घटनेच्या वेळी पार्क केलेली वाहने अधिक वेगाने हलवण्यात आली असण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

झाड कोसळण्याच्या तात्कालिक कारणांपलीकडे जाऊन मुंबईतील वृक्षसंपदेचा आणि पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास केला आहे. झाडांच्या आरोग्याचे आणि कोसळण्याच्या धोक्याचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. झाडांच्या मुळांच्या परिसराचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे.

रस्त्यांवरील खोदकाम, बांधकाम आणि भूमिगत सुविधांची कामे करताना झाडांच्या मुळांना धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे. मातीची स्थिती, पाण्याचा निचरा आणि हवामानातील बदल यांचा झाडांच्या स्थिरतेवर होणारा परिणाम तपासण्याची शिफारस आहे. केवळ वरवरची पाहणी करून झाड सुरक्षित असल्याचा निष्कर्ष न काढता दीर्घकालीन निरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे.

मुंबईतील विविध रस्त्यांवर उपलब्ध जागा, रस्त्यांचे स्वरूप आणि शहरी पर्यावरण लक्षात घेऊन योग्य वृक्षप्रजातींची लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुंबईतील वृक्ष व्यवस्थापन आणि त्याभोवतालच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनात मूलभूत बदल करण्याची सूचनाही दिली आहे.

नेमकं काय झालं होतं?

30 जून 2026 रोजी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी चेंबूरमध्ये वार्ड नंबर 11 मधील रस्त्यावरुन जाणाऱ्या एका स्कूल बसवर (Bus accident) मोठं झाड कोसल्याने भीषण अपघात झाला. या बसमधील 10 लहान मुले झाडाखाली अडकली होती, यातील सर्वांना बाहेर काढले. मात्र, विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला.  यानंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नियुक्त केलेल्या समितीने पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या संरक्षणासाठी कंत्राटदार आणि संबंधित महापालिका विभागांना जबाबदार धरण्याची शिफारस केली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News