अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला फोन कुणाला केला? तपासाबाबत सर्वात मोठी अपडेट
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. यात 3 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई क्राईम : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. यामुळे बॉलिवूड हादरले आहे. संध्याकाळच्या वेळेस जुहू परिसरात टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेत तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबईच्या जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह तिघे जण जखमी झाले आहेत. यात टायगर श्रॉफसह त्याचा चालक आणि एक रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे. टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून घरी निघाला होता. यावेळी पुष्पा पार्क परिसरात बाईकवरुन आलेल्या 3 अज्ञान इसमांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. मात्र, त्याचा चालक आणि त्याच्या कारच्या बाजूने जाणारा एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तपासासाठी 15 पथकं तैनात
मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत माहिती. बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीनी गेळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा शोध सुरू आहे. जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागून कोणतीही इजा झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली. चालकाच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. चालक परदोश आणि चौहाण जखमी झाले आहेत.
टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मुंबई पोलीस आयुक्तांना फोन
टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या ठनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुंबईच्या पोलिस आयुक्तांना फोन केला. अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना बोलावले. तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. लॉरेन्स गँगचे अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत सलमानचे नाव घेत टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याचे उघडपणे सांगितले आहे. यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.