SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले, नंतर काहीच दिवसांत तीन खांब पाडण्याची नामुष्की, काय घडलं नेमकं?

घाटकोपरमध्ये नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होताच पाडण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. कारण काय?

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 06, 2026, 09:06 AM IST | Updated: Oct 06, 2026, 09:08 AM IST
Image Credit: ghatkopar new railway bridge
Join


घाटकोपरसाठी नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले. पण बांधकाम सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तीन खांब पाडण्याची नामुश्की प्रशासनावर आली आहे. उड्डाणपुलाच्या आराखड्यात त्रुटी निर्माण झाल्या कारणाने सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आधीच उभारण्यात आलेले तीन खांब अंशतः पाडण्यात येत आहेत. वाहतुकीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा बदल करण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) अधिक उंचीवर पुन्हा बांधकाम होणार आहे.

घाटकोपर-विक्रोळी स्थानकांदरम्यान अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील जुना पादचारी पूल धोकादायक झाल्याने तो पाडून नव्याने उभारण्यात येत आहे. मूळ आराखड्यानुसार या ठिकाणी मुख्य पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी केबल आधारित पूल प्रस्तावित होता. नव्या आराखड्यानुसार नवीन दुहेरी पूल उभारण्यात येणार आहे.

एलबीएस जंक्शन ते पंतनगर जंक्शनदरम्यान सध्याच्या रस्त्याच्या पातळीवर स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलावरून पूर्व-पश्चिमदरम्यानची घाटकोपर स्थानिक वाहतूक थेट करता येणार आहे.

प्रकल्पाचे काम अद्याप सुमारे 30 टक्केच पूर्ण झाले असल्याने आराखड्यातील बदल  करण्याची ही योग्य वेळ आहे. पूल पुढील ८० ते १०० वर्षे वापरला जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर बदल करण्यापेक्षा आताच आवश्यक सुधारणा करणे अधिक योग्य आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, त्याआधीही एमएमआरडीवर एक पूल पाडण्याची नामुष्की ओढावली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) एका मोठ्या चुकीमुळे मेट्रो-7ए (Metro 7A) मार्गिकेचा सुमारे 260 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल (व्हायाडक्ट) पाडण्याची नामुश्की ओढवली आहे. नियोजन आणि डिझाइनमधील गंभीर त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मेट्रो-7ए ही मार्गिका अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी आहे. विलेपार्ले पूर्व येथील 'एअरपोर्ट कॉलनी' स्थानकाजवळ बांधण्यात आलेल्या उन्नत पुलाची (Elevated Viaduct) उंची विमानतळ प्राधिकरणाच्या नियमां पेक्षा (Funnel Zone Restrictions) तब्बल 2.5 मीटरने जास्त झाली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES