SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नवी मुंबईत भारतातील पहिले ज्वेलरी पार्क; 1 लाख लोकांना रोजगार मिळणार

नवी मुंबई मध्ये ज्वेलरी पार्कचे भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून एक लाख लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 25, 2026, 07:26 PM IST | Updated: Oct 25, 2026, 07:30 PM IST
Join

नवी मुंबई :  नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारण्यात येणार आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी इंडिया ज्वेलरी पार्क ऐवजी भारत ज्वेलरी पार्क नाव ठेवलं असतं तर  IJP चं BJP झालं असंत, असं मिश्कील वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. या ज्वेलरी पार्कमुळे 1 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

नवी मुंबई महापे औद्योगिक वसाहती मध्ये उभारण्यात येणाऱ्या इंडिया ज्वेलरी पार्क चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे तसेच वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. उभारण्यात येणाऱ्या ज्वेलरी पार्क मधून एक लाख रोजगार उपलब्ध होणार असून,येथून भारतातील ज्वेलरी जगात ओळखली जाणार असून, जगात भारतातील ज्वेलरीला वेगळी ओळख मिळणार आहे. 

इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.  यामुळे एक लाख लोकांना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. देशातील सर्वात आधुनिक पार्क या ठिकाणी असणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. सातत्याने वेगवेगळे नेरेटिव्ह तयार केले जातात.  देशाच्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट मध्ये एकूण एक्सपोर्टच्या 58% एक्सस्पोर्ट महाराष्ट्र करत आहे. आपल्यानंतरची गुजरात सह इतर चार राज्य पकडली तरी त्यांचा एक्सपोर्ट आपल्यापेक्षा कमी आहे. या क्षेत्रातलं लीडर महाराष्ट्र आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.   हे पार्क तयार झाल्यानंतर जेम्स अँड ज्वेलरीच्या उद्योगातील तीस ते चाळीस वर्षांची लीडरशिप महाराष्ट्राची असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

अर्थव्यवस्थेत भारतीय दागिने उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा 7 टक्के वाटा आहे.  तर विक्री निर्यातीत 14 टक्के असून या क्षेत्रात 50 लाख कामगार आहेत. या क्षेत्रात नव कल्पना याव्यात, जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्यासाठी पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील या नव्या ज्वेलरीपार्कमुळे या क्षेत्राला चालना मिळणार आहे. 

मुंबईतील इंडिया ज्वेलरी पार्क हा जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचा प्रकल्प आहे. येथे निर्मिती कारखाने, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक कामगारांसाठी निवासस्थान आणि व्यापारी आधारभूत सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES