SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोकणातील 'या' जिल्ह्यांत पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा इशारा, असे असेल हवामान

आज सोमवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पाऊसाचे आगमन झाले.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 20, 2026, 07:35 AM IST | Updated: Oct 20, 2026, 07:37 AM IST
Image Credit: maharashtra weather update
Join

राज्यात उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता पावसाचे वातावरण काहीसे निवळले आहे. आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

कोकणात पाच दिवस पाऊस

कोकणात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या पाच दिवसांत कोकण भागातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचही दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.  रत्नागिरीत 23 ऑक्टोबर वगळता उर्वरित चारही दिवस 1 ते 5 मि.मी. हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडमध्ये 20 ऑक्टोबर रोजी 4 मि.मी. आणि 22 ऑक्टोबर रोजी 2 मि.मी. पाऊस पडू शकतो.

ठाणे जिल्यात 22 ऑक्टोबर रोजी 2 मि.मी. हलक्या पावसाची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस राहून हवामान काहीसे उष्ण राहील.  पालघर जिल्ल्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात ताशी ३ ते ७किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES