SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात जोमाने उतरा'; उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन दिला आदेश, 'जनतेमधील राग रस्त्यावर दिसू द्या'

4 ऑक्टोबरच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनामध्ये जोमाने उतरा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Sep 30, 2026, 08:33 PM IST | Updated: Sep 30, 2026, 08:37 PM IST
Join

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. भायखळ्याहून सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार असून मुंबई महापालिकेच्या मुख्यालया समोर या मोर्चाची सांगता सभा होणार आहे. या मोर्चात सर्व पक्षांन सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. दरम्यान यासंदर्भात आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्धचा राग जो जनतेमध्ये आहे तो रस्त्यावर दिसू द्या, असे आदेश दिले आहेत.

राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनीही विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. 4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याबाबत आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचाही उद्धव ठाकरेंचे आदेश आहेत. तसेच येणाऱ्या दसरा मेळाव्यासंदर्भात देखील महत्त्वाचे आदेश दिले.

बैठकीत उद्धव ठाकरेंनी 4 ऑक्टोबरच्या मुख्य निवडणूक आयोगगाविरोधातील आंदोलनामध्ये जोमाने उतारा, असे विभाग प्रमुखांना आदेश दिले. निवडणूक आयोगाविरुद्धचा राग जो जनतेमध्ये आहे तो रस्त्यावर दिसू द्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या दसरा मेळाव्या संदर्भात देखील महत्त्वाचे आदेश त्यांनी दिले आहेत.
ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी 4 ऑक्टोबरला मोर्चाची हाक दिलीय. केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या फुटीनंतर विरोधकांनी एकजूट दाखवत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ठाकरे बंधूही आता निवडणूक आयोगाविरोधात मैदानात उतरणार आहेत.. मोर्चात कोणताही राजकीय झेंडा नसेल केवळ तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ठाकरेंकडून करण्यात आलं आहे.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात भायखळामधून 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार आहे.. रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी, भायखळा येथून मोर्चा निघणार. मुंबई महापालिकेसमोर मोर्चाचं सभेत रूपांतर आणि सांगता होईल.

विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात असताना, आयोगानं उत्तर देणं गरजेचं आहे, मात्र भाजप नेते त्यावर का बोलतायत असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. दरम्यान हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी देखील भाजपवर शरसंधान साधलंय. तर आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार योग्य वेळी प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हणत फडणवीसांनी देखील पलटवार केला आहे..

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फक्त ठाकरेच नव्हे तर काँग्रेसनं देखील आंदोलन सुरू केलं आहे, तर दुसरीकडे सीजेपीही 2 तारखेला आंदोलन करणार आहे, लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणा-यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका ठाकरेंनी घेतली आहे, तर ठाकरेंच्या या विधानाला पटोलेंनी देखील दुजोरा दिला आहे..

तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणूक आयोगासह सरकारवर टीका करण्यात आली आहे. संविधानाचे रक्षकच भक्षक बनत चाललेत अशा निशाणा खरगेंनी मोदींवर साधला.. तसंच या बैठकीत काही प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

मतदार यादीतील प्रत्येक मोठ्या बदलाची माहिती सार्वजनिक करावी

निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, निर्णय पारदर्शक असावेत

ज्यांची नावं वगळली, त्यांना माहिती आणि अपील करण्याची संधी मिळावी

राजकीय पक्षांना मतदार यादी आणि संबंधित माहिती सोप्या उपलब्ध व्हावी

जिथे गंभीर विसंगतीचे पुरावे समोर येतील तिथे स्वतंत्र, वेळेवर चौकशी व्हावी


ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केलं आहे, याआधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते, तसंच त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावं असंही आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र आता सर्वच विरोधकांनी एकजूट दाखवत ज्ञानेश कुमार यांना
लक्ष्य केलंय.. ठाकरे बंधूही ज्ञानेश कुमारांविरोधात मैदानात उतरणार आहेत...

 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES