SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पावसाळा संपताच मुंबईकरांवर आणखी संकट, चार महिन्याच्या दिलाशानंतर...

पावसाळ्यापूर्वी एप्रिलमध्ये मुंबईत पाच दिवस हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती. मार्चमध्येही केवळ पाच दिवस हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत होती.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 09, 2026, 03:01 PM IST | Updated: Oct 09, 2026, 03:03 PM IST
Image Credit: Mumbai air quality
Join

महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. राज्यातील पावसाळी हंगाम आता संपल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळा संपल्यानंतर मुंबईकरांवर आणखी एक संकट घोंगावतंय. चार महिन्यांच्या दिलाशानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. गुरुवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 120 वर पोहोचला होता.

पावसाळ्यात समुद्रावरून येणारी हवा प्रदूषके वाहून नेत असल्याने, तसेच पावसामुळे धूळ जमिनीवर बसत असल्याने मुंबईची हवा सलग चार महिने चांगली आणि समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली. मात्र, आता मुंबईच्या हवेत प्रदूषके जाणवू लागली आहेत.

फटाक्यांमधून होणारे प्रदूषण आणि बांधकामांतील धुळीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.  मुंबईतील 11 हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्पांमुळे प्रदूषणाची चिंता वाढली आहे. बांधकामांची धूळ आणि फटाक्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास हवा आणखी खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांकडे लक्ष आहे.

मुंबईतील हवा मध्यम प्रदूषणाच्या श्रेणीत नोंदवली गेली आहे. तर वरळीमध्ये सर्वाधिक 161 AQI ची नोंद झाली आहे तर देवनारमध्ये 154, सिद्धार्थनगरमध्ये 152, तर नेव्ही नगरमध्ये 150 AQI ची नोंद झाली आहे.

मुंबईत रस्ते, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी

6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 4 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. त्यापूर्वी आदेश मागे घेतल्यास त्यानुसार बदल होईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, भारतीय न्याय संहिता, 2023, स्फोटक अधिनियम, 1884 तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार तीन ते पाच हजारांपासून लाखो रुपयांचा दंड आणि 2-3 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

नायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES