SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नॅशनल पार्कच्या खालून जाणारा बोगदा, मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प

जुळे बोगदे खणण्यासाठी दोन 'टीबीएम' मशीन दाखल झाल्या आहेत. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 20, 2026, 01:25 PM IST | Updated: Oct 20, 2026, 01:27 PM IST
Image Credit: Mumbai GMLR Project
Join

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गंत दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे दोन बोगदे उभारण्यात येणार आहेत. या बोगद्यांच्या कामासाठी दोन टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. या दोन टीबीएम मशीनची नावं तुळशी आणि विहार अशी असून कामाला सुरुवातदेखील झाली आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी 12.20 किमी लांबीचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता उभारण्यात येणार आहेत. गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या जोडरस्ता कामाला वेग आला आहे.

बोगद्यासाठी वापरण्यात आलेल्या टीबीएम मशीनपैकी 'तुळशी' या पहिल्या बोगदा खनन संयंत्राद्वारे आतापर्यंत 183 मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.  तसेच, 'विहार' या दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राची चाचणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी प्रकल्पस्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या बोगदा खनन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसंच, प्रकल्पाच्या बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

कसे असतील हे जुळे बोगदे

गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी तीन मार्गिकांचे, सुमारे 5.30 किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे बांधण्यात येत आहेत. या महत्त्वपूर्ण कामासाठी अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांचा वापर करण्यात येत आहे.

कसा असेल हा प्रकल्प?

गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील कामाने आता वेग आला आहे. 27 मार्च 2026 पासून या कामाचा प्रारंभ झाला आहे. तर हा लिंक 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या दोन भागांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपूलावर दुसऱ्या स्तरावरील नाहूर एरोली टोलनाका दरम्यान केबल स्टेड उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES