SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मस्तच! मुंबईकरांना मध्य रेल्वे देणार दिवाळी गिफ्ट; टिटवाळा, कसाराच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील प्रवाशांना 15 नोव्हेंबरपासून 15 डब्यांच्या लोकलच्या वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 23, 2026, 10:06 AM IST | Updated: Oct 23, 2026, 10:09 AM IST
Image Credit: mumbai local train update
Join

मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. मध्य रेल्वे नागरिकांना दिवाळीची मोठी भेट देणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गावर 15 डब्यांच्या आणखी 18 लोकल धावण्याची तयारी मध्य रेल्वेने सुरू केली आहे. दिवाळीनंतर नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

15 नोव्हेंबरपर्यंत टिटवाळा येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-कसारा मार्गावर या फेऱ्या चालवण्याचे नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या फेऱ्या सध्या धावणाऱ्या 12 डब्यांच्या लोकलच्या जागी चालविण्यात येणार असल्याने प्रवासी क्षमता 25 टक्के वाढणार आहे.

कल्याण-कसारा मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी मार्गावरील स्थानकांमध्ये पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. टिटवाळा स्थानकात यासाठी 15 दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. तेव्हा रूळ, सिग्नल यंत्रणा, सिग्नल स्थलांतर आणि ओव्हरहेड वायरसंदर्भातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसंच, आता प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे कामदेखील सुरू आहे

15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्यानंतर कसारा, आसनगाव, वासिंद, खडवली, टिटवाळा आणि परिसरातील स्थानकांवरुन दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत लोकलमध्येही प्रवास करताना गर्दी इतकी असते की प्रवाशांना चढायला व उतरण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्यातून कधीकधी अपघातदेखील घडतात. मात्र 15 डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यानंतर

मध्य रेल्वेने 15 ऑगस्टपासून 12 डब्यांच्या 22 लोकल फेऱ्यांचे 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर केले होते. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकल
फेऱ्यांची संख्या 32 वरून 54 झाली होती. आता कसारा मार्गावरील आणखी 18 फेऱ्यांचे रूपांतर झाल्यानंतर ही संख्या 72 वर पोहोचणार आहे.

मध्य रेल्वेच्या एकूण 1,820 लोकल फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ होणार नसून, सध्याच्या फेऱ्यांमधूनच अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. 12 डब्यांच्या तुलनेत 15 डब्यांच्या लोकलमधून सुमारे 25 टक्के अधिक प्रवाशांची वाहतूक करता येते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES