SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईकरांचे पाणी चोरीला जातेय, 500 दशलक्ष लिटर पाण्याची होतेय चोरी, BMCने काय म्हटलं?

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 97 टक्के भरलेली असली तरी 'एल निनो'च्या प्रभावामुळे हे पाणी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 04, 2026, 03:08 PM IST | Updated: Oct 04, 2026, 03:10 PM IST
Image Credit: loses 34 percent water
Join

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट नोंदवली आहे. त्यामुळं निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट आहे. तसंच, पावसाचे प्रमाण घटल्याने वर्षभरात पाण्याचा साठा पुरेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पाण्याची चिंता असतानाच मुंबईकरांच्या पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 34 टक्के पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबईला सात धरणांतून सुमारे 150 किमीहून येणाऱ्या पाण्यातील 34 टक्के पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जात आहे. याचा परिणाम मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याची कबुली स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.  हे वाया जाणाऱ्या पाण्यातील किमान 10 टक्के म्हणजे 500 दशलभ लिटर पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही धरणे सध्या भरली असली तरी अल निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने पालिकेला ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच सद्यस्थितीत सुरू असणारी १० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे संकेतही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतून मुंबईला दर दिवशी 4100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मुंबईची पाणीपुरवठ्याची दैनंदिन गरज 4600 दशलक्ष लिटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सात धरणांतील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने गारगाई धरण, निःक्षारीकरण प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर असे विविध प्रकल्प आखत आहे. मात्र एकाबाजूला असलेल्या पाण्यापैकी 34 टक्के पाणी पालिकेच्या हिशोबाच्या बाहेर असल्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES