SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हजारो कोटींवर डल्ला... 350 एकर मुंबई नेमकी गेली कुठे? सॅटेलाइट डेटामधून हादरवणारा खुलासा

मुंबईमधील जमिनीला सोन्याचा भाव असतानाच याच जमिनीसंदर्भातील हादरवून टाकणारी माहिती नुकतीच समोर आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरएच्या माध्यमातून एक थक्क करणारी आकडेवारी प्रकाशझोतात आलीये. त्याबद्दलच...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 14, 2026, 09:09 AM IST | Updated: Oct 14, 2026, 09:28 AM IST
Image Credit: समोर आली थक्क करणारी आकडेवारी (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्सवरुन साभार)
Join

मुंबईतील बेकायदा बांधकामांसंदर्भात हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.  मुंबईत 2011 ते 2025 या 14 वर्षांमध्ये शहरातील जवळपास 350 एकर (141.35 हेक्टर) जमिनीवर बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरएच्या नवं डिजिटल पोर्टलमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 350 एकर जमिनीची सध्याच्या बाजार भावाप्रमाणे किंमत हजारो कोटी रुपये आहे.

कुठून समोर आली ही माहिती?

एसआरएच्या 'नेट्रॉम' म्हणजेच 'नेटवर्क फॉर इन्क्रोचमेंट ट्रॅकिंग अँड रिपोर्टींग फॉर मुंबई'च्या उपग्रह डेटाने संकलित केलेल्या माहितीमधून बेकायदेशीर बांधकामांसंदर्भातील ही आकडेवारी समोर आली आहे. या माहितीनुसार, एकूण 350 एअर जमीन आता बेकायदेशीर बांधकामांसाठी वापरण्यात आली आहे. नेमकी कोणाच्या मालकीच्या किती एअर जमिनीवर ही बांधकामं झाली आहेत ते ही या सविस्तर अहवालामधून उघड झालं आहे.

कोणाच्या जमिनीवर किती अतिक्रमण?

खाजगी जमिनीवर सर्वाधिक 66.50 हेक्टर (164.32 एकर)
राज्य सरकारच्या जमिनीवर 53.35 हेक्टर (131.83 एकर)
बीएमसीच्या जमिनीवर 15.34 हेक्टर (37.90 एकर)
एमएचएडीएच्या जमिनीवर 6.31 हेक्टर (15.59 एकर)
एमएमआरडीएच्या जमिनीवर 0.09 हेक्टर (0.22एकर)

काही मोठी अतिक्रमणे

कफ परेड येथे सुमारे 8 हजार मीटरवरील खारफुटीच्या जमीन अतिक्रमण
बोरीवली पश्चिमेमधील गणपत नगरमध्ये 22 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त अतिक्रमण
मानखुर्द-देवनार येथे नाल्याभोवती 18800 चौरस मीटरवर झोपडपट्ट्या
मालाड पश्चिमेमधील मालवणीतही मोठ्या प्रमाणात जमीन झोपडपट्ट्यांनी व्यापली

'एसआरए'ने बीआयएसएजी-एन या संस्थेच्या मदतीने हे पोर्टल तयार केले आहे. 2000, 2011 आणि 2025 च्या उच्च गुणवत्तेच्या उपग्रह प्रतिमांवरून अतिक्रमण शोधले जाते. माहिती संबंधित यंत्रणांकडे पाठवून कारवाई सुलभ केली जाते. अधिकृत झोपडपट्टी पुनर्वसन कट-ऑफ तारीख 1 जानेवारी 2000 आहे. 2011 पर्यंतच्या बांधकामांना काही अटींवर नियमित करता येते, पण त्यानंतरची अतिक्रमणे अवैध मानली जातात आणि पाडली जाऊ शकतात.

मुंबईत किती झोपडपट्टी?

अतिक्रमण झालेल्या क्षेत्राची टक्केवारी 68 पर्यंत पोहोचली आहे. वाढले. झोपड्या आता मुंबईच्या एकूण जमिनीच्या सुमारे 24 % भाग व्यापतात आणि अर्ध्याहून अधिक लोकसंख्या तिथे राहते. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एकूण सुमारे 2.23 लाख झोपड्या आहेत, ज्यापैकी 39,111 झोपड्या या बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या 14 फूट किंवा अधिक उंच आहेत. यापैकी पूर्व उपनगरात सर्वाधिक 31227, पश्चिम उपनगरात 4536 आणि शहर विभागात 3348 झोपड्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES