SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नालासोपाऱ्यातील तरुणाचे भयानक कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत धर्मांतरासाठी तरुणींवर दबाब आणल्याचा आरोप

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत धर्मांतरासाठी तरुणींवर दबाब आणल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या तरुणाने दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार केलाची तक्रार देखील पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 13, 2026, 06:25 PM IST | Updated: Oct 13, 2026, 06:31 PM IST
Join

नालासोपारा क्राईम :  नालासोपाऱ्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं लैंगिक शोषण करुन मारहाण केली. तसेच आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या आरोप 22 वर्षीय तरूणावर करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणाला अटक करून दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. धर्मांतरासाठी दबाव तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप तरूणावर करण्यात आला.  या दोन्ही प्रकरणांचा तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

नालासोपाऱ्यात एकाच 22 वर्षीय तरुणाविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण, मारहाण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप एका प्रकरणात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात हिंदू धर्म आणि महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यासह महिलांचे अश्लील व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रमांकावर पाठवल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

पहिल्या प्रकरणात 9 ऑक्टोबर रोजी छेडानगर येथील जिममध्ये हिंदू धर्म, नवरात्रोत्सव आणि हिंदू महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आरोपीवर आहे. त्यानंतर मोबाईलची तपासणी केली असता महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच व्हॉट्सॲपवरून आंतरराष्ट्रीय क्रमांकावर असे व्हिडीओ पाठवल्याचे तपासात समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, दुसऱ्या प्रकरणात 23 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीची आई आणि मावसभाऊ यांनीही मारहाण करून तिला डांबून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नवरात्रीच्या काळात बुरखा परिधान करण्यास, नाव बदलण्यास आणि धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
एकाच आरोपीविरोधात दाखल झालेल्या या दोन गुन्ह्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, दोन्ही प्रकरणांतील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, नालासोपाऱ्यात कथित लैंगिक शोषण, फसवणूक आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ परदेशात विकल्याचा आरोप करत मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात 30 हून अधिक व्हिडिओ क्लिप्स पोलिसांकडे दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, नालासोपारा पोलिसांनी आरिफ अयुब शेख (वय २२) याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, मारहाण आणि धमकी दिल्याच्या आरोपांचाही गुन्ह्यात समावेश आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES