4 वर्ष प्रेमसंबंध, प्रियकराने केलं धर्मपरिवर्तन; पण ऐनवेळी प्रेयसीने...नेरूळ स्टेशनबाहेर थरार
चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमापोटी प्रियकराने धर्म परिवर्तनसुद्धा केलं होतं. पण एका संशयावरून होणाऱ्या सतत वादामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
नवी मुंबईमधील नेरूळ स्टेशनबाहेर थरारक घटना घडली. 21 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने चाकूने हल्ला केला. ज्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचं नाव सादिया जाकीर शेख असं आहे. तर प्रियकराचं नाव दानिश मोहम्मद अन्सारी असून घणसोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर हे दोघे वडाळा परिसरात राहत होते. पोलिसांनी सांगितलं या प्रकरणाच्या तपासणीदरम्यान समजलं की, या दोघांचं गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
त्या एका संशयावरून तरुणीची हत्या!
तरुणीच्या हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास केल्या असता असं समोर आलं की, सादिया आणि दानिश यांचं गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमापोटी दानिशने धर्म परिवर्तनही केलं होतं. पण गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. प्रियकराला प्रियसीवर संशय होता की, तिचं दुसऱ्या तरूणीसोबत संबंध आहेत. कारण जेव्हा दानिशने सादियाला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. ती कायम लग्नाच्या विषयावरून टाळाटाळ करायची. त्यामुळे दानिशचा राग अनावर झाला आणि त्याने तिला नेरूळ स्टेशनबाहेर गाठलं. इथे तिच्यावर चाकूने सपासप वार केले. ज्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान घणसोलीमधील नेरूळ पोलिसांनी दानिश मोहम्मद अन्सारीला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
संभाजीनगरमधये तरुणाची हत्या
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोमधल्या बळीराम पाटील हायस्कूल जवळ एका तरुणाचा भर रस्त्यात निर्घृण खून झालाय. त्याच्या वर वार करण्यात आलाय . खून करणारे पसार झाले आहेत. नेमका खून का आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रॅफिक जाम झालेला आहे. नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह घरी घेऊन जाणार नाही अशी भूमिका घेतलीय.
तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या
शिरूर तालुक्यातील कोंढापुरीत एका तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या भीषण हत्याकांडाने संपूर्ण कोंढापुरी परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. महेंद्र लहू सकट असं या मृत तरुणाचं नाव आहे. कोंढापुरीतील खंडोबा मंदिराच्या परिसरातील तळ्याजवळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना महेंद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. शरीरावर धारदार शस्त्रांनी खोलवर वार करण्यात आले असून अत्यंत क्रूरपणे हा खून करण्यात आला आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. हा खून जुन्या वैमनस्यातून झाला की इतर काही कारणावरून, याचा कसून तपास आता पोलीस करत आहेत.