SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नवी मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास फक्त 60 मिनिटांत; कोकणात जाण्यासाठी सर्वात सुपरफास्ट पर्याय

नवी मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास फक्त 60 मिनिटांत होणार आहे. कोकणात जाण्यासाठी सर्वात सुपरफास्ट पर्याय उपलब्ध होणार आहे. लवकरच या मार्गावर विमानसेवा सुरु होणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 27, 2026, 08:51 PM IST | Updated: Oct 27, 2026, 08:57 PM IST
Join

नवी मुंबई विमानतळ: कोकणात जायचे असेल तर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि दुसरा म्हणजे कोकण रेल्वे. मुंबई गोवा हायवेवरुन गेल्यास प्रवासाकरिता 8 ते 9 तास लागतात. तर, कोकण रेल्वेने गेल्यास 7 ते 8 तासांचा प्रवास करावा लागतो. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होत. आता कोकणचा प्रवास अगदी जलद आणि सुखद होणार आहे. कोकणात जाण्यासाठी सर्वात सुपरफास्ट पर्याय मिळणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास फक्त फक्त 60 मिनिटांत होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरुन सिंधुदूर्गसाठी विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. वर्षाअखेरीस नवी मुंबई ते सिंधुदूर्ग विमान सेवा सुरु होऊ शकते. 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासाठीची विमान सेवा नव्या दमाने सुरु होणार आहे.  नवी मुंबई ते  चिपी(सिंधुदुर्ग)- नवी मुंबई आणि चिपी (सिंधुदुर्ग) ते नवी मुंबई हवाई मार्गाकरिता विमान कंपन्यांना शंभर टक्के ( व्यवहार्यता तफावत निधी - Viability Gap Funding) निधी देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे विमान सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. विमान भाडे 3,580 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे विमान कंपन्यांना शंभर टक्के  निधी देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. 

पर्यटनाला चालना मिळणार

नवी मुंबई ते सिंधुदूर्ग अशी थेट विमान सेवा सुरु झाल्यास कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोकणातील लोकांना दिलासा मिळणार आहे.  येथे हवाई वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे गोवा मार्गे तळ कोकणातील लोकांना हवाई मार्गे यावं लागत होतं. आता मात्र, थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. 

15 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबई ते सिंधुदूर्ग अशी विमान सेवा सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडथळ्यांमुळे ही सेवा सुरु होऊ शकली नाही. आता मात्र, लवकरच नवी मुंबई ते सिंधुदूर्ग विमान सेवा सुरु होणार आहे.  दिवाळी, ख्रिसमस, थर्टी फस्टसाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना या विमान सेवाचा मोठा फायदा होणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES