SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुन्हा भाडेवाढीचे संकट! रिक्षा-टॅक्सीचालकांकडून दरवाढीची मागणी, काय आहे कारण आणि किती करणार दरवाढ?

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा रिक्षा-टॅक्सीचालकांकडून दरवाढीची मागणी करण्यात आली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 04, 2026, 08:55 AM IST | Updated: Nov 04, 2026, 08:58 AM IST
Image Credit: Mumbai Auto Fare
Join

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत असंख्य लोक हे रिक्षा टॅक्सीने दररोज प्रवास करतात. या ग्राहकांचया खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. कारण रिक्षा-टॅक्सीचालकांकडून पुन्हा एकदा दरवाढीची मागणी करण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सीच्या दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रति किलो 8  रुपयांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाची वाढ झाल्यामुळे सीएनजीचा दर आता प्रति किलो 90 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे इंधन खर्च वाढल्याने रिक्षा-टॅक्सी चालवणे परवडत नसल्याची चालकांची तक्रार आहे. त्यामुळे रिक्षा - टॅक्सीची भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

मुंबईकरांच्या खिशावर किती भार वाढेल?

दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर रिक्षा - टॅक्सीचा पर्याय निवडतात. त्यामुळे रिक्षा - टॅक्सी चालक यांनी किती रुपयांची दरवाढची मागणी केली आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे असणार आहे. कारण याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे. तर रिक्षाच्या किमान मीटर भाड्यात 2 रुपयांनी तर टॅक्सीच्या किमान मीटर भाड्यात 3 रुपये वाढ करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

रिक्षा - टॅक्सी चालकांनी सांगितलं की, सीएनजी दरवाढीचा थेट परिणाम चालकांच्या रोजच्या उत्पन्नावर होत आहे. शिवाय वाहन देखभाल खर्च, कर्जाचे हप्ते आणि घरखर्च भागवताना चालकांची आर्थिक कसरत होत आहे. त्यामुळे त्यांना ही दरवाढी करण्याची गरज भासतेय.

महत्त्वाचे म्हणजे 2 सप्टेंबरपासून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून (MMRTA) यापूर्वीच रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपये आणि टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दरवाढ केल्यास सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. तर महानगर गॅसकडून सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे चालकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सीएनजी दरवाढीच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीचे भाडे वाढवण्याची चालकांनी मागणी केली आहे.

मुंबईतील सीएनजी दरवाढ

कालावधी        | प्रति किलो दर |

| मे – पहिली वाढ | ₹८४           
| मे – दुसरी वाढ | ₹८६           
| सप्टेंबर       | ₹८८           
| ऑक्टोबर        | ₹८९           
| नोव्हेंबर      | ₹९०
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES