दिशा सालियन प्रकरणात महत्त्वाची अपडेट! सचिन वाझेंचा मोठा खुलासा, एनआयए कोर्टाला सांगितलं...
राज्यात दिशा सालियन प्रकरण गाजत असताना सचिन वाझे यांनीही मोठा खुलासा केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवशांपासून सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण गाजतंय. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात नव्याने आदेश दिल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली. त्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी नावं असल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. आता या प्रकरणात एकापेक्षा एक मोठे खुलासे होत आहेत. दुसरीकडे सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. अशातच सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे.
सचिन वाझे हे दिशा सालियन प्रकरणात माजी एटीएस अधिकारी होते. सचिन वाझे यांनी पहिल्यांदाच दिशा सालियन प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे एक अर्ज केला आहे. या अर्जात सचिन वाझे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात त्यांचं नाव जाणीवपूर्वक घेऊन बदनामीची मोहीम चालविण्यात येत आहे. सतीश सालियन यांचे वकील आणि काही माध्यमे ही मोहीम जाणीवपूर्वक चालवत आहेत.
या अर्जात त्यांनी अजून एका प्रकरणाचा उल्लेख केला आहे. निलेश ओझा यांनी दावा केला होता की, वाझेंच्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला होता. तसंच दिशाच्या प्रकरणात कबुली जबाब आहे. यातले पुरावे नष्ट केले आहे. तो माफीचा साक्षीदार बनण्यास तयार आहे. तर सचिन वाझे यांनी या निलेश ओझा यांच्या दाव्याला अर्जातून फेटाळून लावला आहे.
वाझे अर्जातून म्हणाले की, मी निलेश ओझा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. माझ्याकडून कोणतीही माणसं त्यांना भेटायला गेली नाहीत. ओझा यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. तसंच या प्रकरणात कबुलीजबाब देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सचिन वाझे यांनी अर्जातून स्पष्ट केलं आहे. तसंच सीबीआयने या प्रकरणात जर त्यांचे प्रोडक्शन वारंट मागितले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी विनंती वाझे यांनी अर्जाद्वारा कोर्टाकडे केली आहे.