SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी रिक्षा चालक कनेक्शन समोर, वांद्र्यात...

टायगर श्रॉफवर रविवारी हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता पोलिसांनी तपासाला वेग घेतला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 21, 2026, 10:15 AM IST | Updated: Oct 21, 2026, 10:17 AM IST
Image Credit: Tiger shroff attack news
Join

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस सूत्रांनुसार, हल्लेखोरांचे पहिले टार्गेट टायगर नव्हताच, तर अनेक बडे कलाकार हल्लेखारांच्या लिस्टवर होते. टायगर श्रॉफच्या हल्ल्याच्या अगोदर सलमान खानच्या घराची आरोपीकडून रेकी करण्यात आली होती.

अत्यंत विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्लेखोर सुमारे महिनाभरापूर्वी मुंबईत आले होते आणि सेलिब्रिटींच्या घरांची पाहणी करत होते. मुंबईत फिरत असताना ते  ऑटो-रिक्षामधून प्रवास करत होते.

हल्लेखोर रिक्षा चालकाला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी घेऊन जाण्यास सांगत होते. कारण त्यांना त्यांच्या घराचे फोटो काढायचे होते. त्यानंतर, वेगवेगळ्या ऑटो-रिक्षा चालकांनी त्यांना अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींच्या घरी नेले होते.

मात्र, हल्लेखोरांना कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याची सूचना देण्यात आली होती. अशाच एका रिक्षा चालकाने त्यांना सांगितले की, टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू मैदानावर फुटबॉल खेळतो. यानंतर, ते 11 ऑक्टोबर रोजी जुहू मैदानावर गेले. मात्र टायगर श्रॉफ तिथे नव्हता. त्यानंतर ते पुढच्या रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी, शस्त्र घेऊन पुन्हा गेले.

पोलीस सूत्रांनुसार, याच काळात हरियाणामधील इतर अनेक व्यक्तीही मुंबईत आल्या होत्या. त्यांनी पाहणी केली आणि नंतर ते पुन्हा हरियाणाला परत गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी या हल्ल्यात एक परदेशी आणि गावठी पिस्तूल वापरले होते. त्यापैकी कोणते पिस्तूल विदेशी आहे हे त्यांना माहीत नव्हते. तसंच, टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर जेव्हा आरोपी मुंबई सोडून गेले. तेव्हा त्यांनी ही दोन्ही शस्त्रे एका अज्ञात ठिकाणी टाकून दिली. ज्याचा शोध मुंबई पोलीस आता घेत आहेत.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठा सिंडिकेटचा मोठा खुलासा झाला आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठ्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीचा वापर झाल्याची माहिती. अमृतसरमध्ये अज्ञात व्यक्तीने ठेवलेली शस्त्रे घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात अटक केलेले आरोपी कुणाल आणि सुमित हे दोन आठवड्यांपूर्वी गेले होते. बिश्नोई गॅगचा हस्तक असलेल्या अनिल पंडितने दोघांना शस्त्रे ठेवलेल्या ठिकाणाची लोकेशन पाठवली होती.

शस्त्रांची मुंबईत वाहतूक करण्यासाठी कुणालने दिल्ली पोलिसांनी  अटक केलेल्या राधा आणि बबिताचा वापर केल्याची माहिती. या कामासाठी अनिल पंडितने कुणाल आणि सुमितला 70 ते 80 हजार रुपये दिल्याचा संशय. आरोपींनी 10 ते 12 हजार रुपये राधा आणि बबिताला दिल्याची माहिती.

जुलैमध्ये सोनीपत कारागृहातून बाहेर आलेल्या कुणालचा मित्रामार्फत अनिल पंडितशी संपर्क झाला होता. त्यानंतर एन्क्रिप्टेड अॅपद्वारे संपर्क सुरू होता, राधा आणि बबिता सोनीपतच्या कारखान्यात काम करत असल्याची माहिती तपासातून समोर.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES