SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हादरवणारी बातमी! टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या कटात दोन महिलांचाही समावेश; दादरमधील हॉटेलमध्ये दोघींनी...

टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुंबईमध्ये गोळीबार करण्यात आला. एका मैदानामधून कारमधून टायगर बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आला दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 21, 2026, 07:17 AM IST | Updated: Oct 21, 2026, 07:30 AM IST
Image Credit: अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश
Join

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एनडीआर पथकाने दोन महिलांसह चार आरोपींना अटक केली आहे. कुणाल, सुमित, राधा आणि बबीता अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर मुंबई सीआयडीने चारही आरोपींना औपचारिकरीत्या अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांना आरोपींची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली.

जामिनावर बाहेर आल्यानंतर कुणालचा कटात सहभाग?

पोलिसांच्या तपासानुसार, कुणाल नुकताच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. एका मित्रामार्फत त्याची अनिल पंडितशी ओळख झाली होती. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणाल अमृतसरहून एक पिस्तूल आणि 20 काडतुसे घेऊन आला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी भेट झाली. त्यानंतर त्याने राधाला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केले.

15 ऑक्टोबरला दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले

15 ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिताला घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितचे निर्देश दोन्ही महिलांपर्यंत पोहोचवत होता. 17 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता मुंबईतील दादर येथे पोहोचल्या. त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये थांबल्या. त्याच दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतली.

18 ऑक्टोबरला टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. गोळीबारानंतर अनिल पंडितने कुणालला फोन केला. शूटर मुंबईत अडकले असून त्यांच्या पळून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच दिवशी राधा आणि बबिता दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाल्या.

20 ऑक्टोबरला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

20 ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. तर कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.

शस्त्रांचा पुरवठा आणि सूत्रधारांचा शोध सुरू

या प्रकरणात शस्त्रांचा पुरवठा कोणी केला, आरोपींचा सूत्रधार अनिल पंडित याच्याशी नेमका काय संबंध आहे आणि गोळीबार करणाऱ्या शूटरशी त्यांचे कनेक्शन कसे होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, तापासामध्ये आरोपींनी सोशल मीडियावरुन टायगरसोबत फारशी पोलीस सुरक्षा नसते याची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी टायगरवर हल्ला करण्याचं निश्चित केल्याचं सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES