SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

LIVE Updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; 3 संशयित ताब्यात

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 october 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 19, 2026, 09:53 AM IST | Updated: Oct 19, 2026, 02:52 PM IST
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 october 2026: अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना मुंबईत घडली असून आज घडामोडींना वेग आला आहे. तर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी असून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  सौरव दास आणि आशुतोष रांकाची आज सुटका होणार का? या घडमोडींकडे लक्ष लागून राहिले आहे. या घडामोडींसह वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

19 Oct 2026, 12:54 PM

गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी

 

तुमच्या पोरा बाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?...गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी...शपथ घेण्यावरुन मतदाराने नेत्यांना फटकारले..

19 Oct 2026, 12:23 PM

Tiger Shroff Attack LIVE: स्थानिक पोलिसांची टीम टायगर श्रॉफच्या घरी दाखल

 

टायगरवर काल झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षित वाढ 
---
कार्टर रोड परिसरात प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांवर करडी नजर 
---
काही वेळा पूर्वी सहायक पोलीस अधिकारी अधिकराव पोळ यांनी संपूर्ण परिसराची चौकशी केली होती 
----
त्यानंतर आता स्थानिक पोलिसांची टीम दाखल

19 Oct 2026, 11:22 AM

Tiger Shroff Attack LIVE: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; 3 संशयित ताब्यात

 


कोटा पोलीस आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्सकडून कारवाई. कोटा स्टेशन परिसरातून २ संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. हल्ल्यानंतर पल्सरवरून अंधेरी स्टेशनकडे गेलेले आरोपी सुरत आणि कोटाच्या दिशेने गेल्याची माहिती

19 Oct 2026, 10:32 AM

Tiger Shroff Attack LIVE: पोलिसांना उघडपणे चॅलेंज कोणी देऊ शकत नाहीः मुख्यमंत्री फडणवीस

 

जे काही घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना आहे, पोलिसांनी तात्काळ या संदर्भातील कारवाई सुरू केली आहे, रात्रीतूनच साधारणपणे जे आरोपी आहेत त्यांचा आयडेंटिफिकेशन करण्यात आले आहे.  त्यांच्या संदर्भातील धागेदोरे पोलिसांना प्राप्त झाले आणि कुठल्याही परिस्थितीत या आरोपींना पोलीस शोधून काढतील, आणि त्यावर कारवाई करतील, आणि एवढेच नाही तर त्यांच्या पाठीशी कोण आहे त्यांनाही शोधून काढण्याचं काम पोलीस करतील. पोलिसांना उघडपणे चॅलेंज कोणी देऊ शकत नाही, हे डरपोक लोक आहेत हे कुठेतरी लपून बसतात आणि तिथून अशा प्रकारच्या वल्गना  करतात आणि यांच्यात हिम्मत नाही

19 Oct 2026, 10:05 AM

Tiger Shroff Attack LIVE: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर पुणे पोलिस अलर्ट

 

-- अभिनेता टायगर श्रॉफ च्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिस "अलर्ट"
-- संशयितांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून रात्री ठिकठिकाणी पेट्रोलिंग
-- बिश्नोई टोळीचे धागेदोरे यापूर्वी पुण्यात आढळल्यामुळे पुणे पोलिस "अलर्ट"
-- यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांमध्ये बिश्नोई टोळीचे अनेक सक्रीय सदस्य पुण्यात आले होते मिळून
-- काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना पुण्यात घेतलं होतं ताब्यात
-- त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात रात्री ठिकठिकाणी पेट्रोलिंग

19 Oct 2026, 10:00 AM

Tiger Shroff Attack LIVE: टायगर श्रॉफवर हल्ला, मुंबई पोलिसांकडून रेल्वे स्थानकांची तपासणी

 

- टायगरवरील गोळीबारानंतर हल्लेखोर अंधेरी स्थानकावरुन पसार
- मुंबई पोलिसांकडून रेल्वे स्थानकांची तपासणी
- रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी
- हल्लेखोर पळून गेल्यानंतर कोणत्या स्थानकावर उतरला याचा शोध सुरु
- लांब पल्ल्याच्या गाड्यावरही पोलीस लक्ष ठेवून
- मुंबई पोलीस इतर राज्यातील पोलिसांचीही मदत घेणार

19 Oct 2026, 9:59 AM

Tiger Shroff Attack LIVE: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

 

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ...टायगरच्या कारवरील गोळीबारानंतर खबरदारी... 
 

19 Oct 2026, 9:58 AM

Tiger Shroff Attack LIVE: बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण

 

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण...घटनेनंतर अनेक कलाकारांनी बोलून दाखवली भीती...

19 Oct 2026, 9:57 AM

Tiger Shroff Attack LIVE: गोकुळात कोण बाजी मारणार?

गोकुळ दूध संघासाठी मतमोजणी सुरु...कोल्हापुरातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...गोकुळात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष

19 Oct 2026, 9:55 AM

Tiger Shroff Attack LIVE: टायगरवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे आदेश

 

टायगरवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई पोलीस आयुक्तांना कडक कारवाईचे निर्देश. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घरी जाऊन घेतली टायगरची भेट… हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याची ग्वाही

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES